आता घरबसल्या मिळणार BSNL सिम! स्वत: करा KYC आणि रांगेशिवाय मिळवा नवं कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
सरकारी टेलकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवीन सेवा सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये 5G सर्विस आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन यांचा समावेश आहे. या सर्विसंनतर आता कंपनीने आणखी एक नवीन सर्विस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या इतर सेवांप्रमाणेच ही सर्विस देखील ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याची ठरणर आहे. कारण या सर्विसमध्ये ग्राहकांना घरबसल्या नवीन सिम कार्ड डिलीव्हर केलं जाणार आहे.
तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता
मोबाईल कनेक्टिविटी अधिक सुलभ व्हावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आता नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी रांगेत उभ राहण्याची गरज भासणार नाही, आता घरबसल्या तुम्हाला नवीन सिम कार्डची डिलीव्हरी मिळणार आहे. ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडले जावेत या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. आता ग्राहक घरबसल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नवीन प्रीपेड किंवा पोस्टपेड सिम ऑर्डर करू शकणार आहे, यासाठी कोणत्याही दुकानात जाण्याची देखील गरज भासणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही नवीन सर्विस सुरु केल्यानंतर आता BSNL कंपनी रिलायंस जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्याच्या रांगेत आली आहे. या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना आधीपासून सिमची घरपोच डिलीव्हरी करतात. आता BSNL ने देखील ही सर्विस सुरु केली आहे. कंपनीने अद्याप सांगितलं नाही की या सर्विससाठी पैसे द्यावे लागणार की ही सेवा मोफत असणार आहे. मात्र इतर टेलिकॉम कंपन्यांचा विचार केला तर त्या सर्विससाठी कोणतेही अतिरिक्त पैसे आकारात नाही. त्यामुळे BSNL देखील ही सेवा मोफत सुरु करण्याची शक्यता आहे.
कंपनीने सुरु केलेल्या या सर्विसचा फायदा घेण्यासाठी सर्वात आधी BSNL च्या विशेष पोर्टलला भेट द्या. इथे तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करणं किंवा विद्यमान नंबर बीएसएनएल नेटवर्कवर पोर्ट करणं असे दोन ऑप्शन पाहायला मिळणार आहेत. यामुळे बीएसएनएलला नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल आणि इतर नेटवर्कच्या वापरकर्त्यांना स्विच करणे देखील सोपे होईल.
ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी युजर्सना एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागणार आहे, ज्यामध्ये KYC (Know Your Customer) साठी पिन कोड, पूर्ण नाव आणि एक पर्यायी मोबाइल नंबरची आवश्यकता असणार आहे. यानंतर त्या पर्यायी नंबरवर एक OTP पाठवला जाईल. यानंतर, आवश्यक स्व-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यानंतरच सिम जारी केला जातो आणि तुमच्या पत्त्यावर पाठवला जातो.
BSNL च्या ग्राहकांची संख्या गेल्या काही दिवसांत प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक जोडण्यासाठी आणि असलेल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कंपनीने ही नवीन सर्विस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.