भारतात सुरु झाली Oppo च्या या स्मार्टफोनची सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आजच करा खरेदी! फीचर्सही आहेत दमदार
Oppo K13x 5G स्मार्टफोनची सेल भारतात सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन 23 जून रोजी लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजेच हा स्मार्टफोन 360-डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी आणि एन्हांस ड्यूरेबिलिटीसाठी MIL-STD 810-H सर्टिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे.
Oppo K13x 5G हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) बेस्ड फीचर्स सपोर्टसह येतो. Oppo K13x 5G स्मार्टफोन ऑफर्ससह ऑनलाईन आणि ऑफलाइन रिटेल चॅनल्सद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर कोणत्या बँक ऑफर्स उपलब्ध आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Oppo K13x 5G ची भारतात किंमत 4GB रॅम+128GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी 11,999 रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनचे 6GB आणि 8GB रॅम व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही रॅम व्हेरिअंट 128GB स्टोरेजसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. 6GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 8GB व्हेरिअंट 14,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन मिडनाइट वायलेट आणि सनसेट पीच कलर ऑप्शन्समध्ये ऑफर करण्यात आला आहे. स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि ऑफिशियल Oppo India स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.
निवडक ऑफर्ससह 6GB आणि 8GB रॅम व्हेरिअंटवर अनुक्रमे 1,000 रुपये आणि 2,000 रुपये डिस्काऊंट उपलब्ध आहे. या ऑफर्समुळे Oppo K13x 5G ची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये, 11,999 रुपये आणि 12,999 रुपये होईल. ग्राहक 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि तीन महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय निवडू शकतात.
डुअल SIM (नॅनो + नॅनो) सपोर्ट वाला Oppo K13x 5G स्मार्टफोन Android 15 बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंच HD+ (720 x 1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. डिस्प्ले स्प्लॅश टच आणि ग्लोव टच टेक्नोलॉजीला देखील सपोर्ट करतात. Oppo K13x 5G 6nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. Oppo ने फोनला Gemini, AI समरी, AI रिकॉर्डर आणि AI Studio सारखे अनेक AI-बेस्ड फीचर्सने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo K13x 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर यांचा समावेश आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.
Oppo K13x 5G च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.4, NFC, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रवेशाविरुद्ध IP65-रेटेड बिल्ड आहे. यासोबतच हा फोन MIL-STD 810-H मिलिट्री-ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. याशिवाय ड्यूरेबिलिटीसाठी बायोमिमेटिक स्पंज शॉक एब्जॉर्प्शन सिस्टम देखील यामध्ये देण्यात आली आहे. Oppo K13x 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.