Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळ येऊदे नाही तर त्सुनामी, तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार प्रत्येक Weather Update; फक्त करावी लागेल ही सेटिंग

Smartphone weather alerts: पाऊस येणार आहे की तुफान, याबाबतची सर्व अपडेट आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला फोनमध्ये काही सोपी सेटिंग करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2025 | 07:45 PM
वादळ येऊदे नाही तर त्सुनामी, तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार प्रत्येक Weather Update; फक्त करावी लागेल ही सेटिंग

वादळ येऊदे नाही तर त्सुनामी, तुमच्या स्मार्टफोनवर मिळणार प्रत्येक Weather Update; फक्त करावी लागेल ही सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या सर्वांबाबत अपल्याला वेळीच अलर्ट मिळणं फार गरजेचं आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या स्मार्टफोनवर हवामान अपडेट मिळवू शकता. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशा काही सेटिंग्ज आहेत, ज्या इनेबल केल्यास तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी आधीच अलर्ट मिळेल.

Amazon ची सर्विस झाली स्मार्ट आणि पावरफुल! आता ड्रोनने होणार तुमच्या iPhone ची डिलीव्हरी, या भागांत सुरु झाली सेवा

काय आहे हे स्मार्टफोनचं फीचर?

लेटेस्ट आणि अपडेटेड Android आणि iPhone स्मार्टफोन्समध्ये Emergency Alerts आणि Weather Alert Notifications सारखे फीचर्स दिले जातात. या फीचर्समुळे तुम्हाला तुमच्या परिसरातील हवामान परिस्थितीतबाबत माहिती मिळते. तुम्हाला केवळ तुमच्या स्मार्टफोनमधील ही सेटिंग अ‍ॅक्टिव्ह करायची आहे. ही सेटिंग अ‍ॅक्टिव्ह करताच जेव्हा तुमच्या परिसरात वादळ, वारा, मुसळधार पाऊस, गारपीट याबाबत इशारा जारी केला जाईल तेव्हा तुमचा स्मार्टफोन तुम्हाला अलर्ट करेल. ही सेटिंग अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Android फोनमध्ये अशा प्रकारे ऑन करा वेदर अलर्ट

  • Settings ओपन करा
  • Safety & Emergency किंवा More Settings वर टॅप करा.
  • इथे Emergency Alerts चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला “Severe Alerts”, “Extreme Threats”, आणि “AMBER Alerts” सारखे पर्याय मिळेल.
  • तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर जे अलर्ट पाहिजे आहेत, त्यांच्या समोरील पर्याय ऑन करा.

iPhone मध्ये अशा प्रकारे ऑन करा वेदर अलर्ट

  • Settings ओपन करा.
  • Notifications वर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा, इथे तुम्हाला Government Alerts सेक्शन दिसेल.
  • तुम्ही Emergency Alerts आणि Public Safety Alerts ऑन करू शकता.

हवामानाची माहिती देणारे अ‍ॅप्स वापरा

तुम्ही स्मार्टफोनमधील अलर्टशिवाय काही अ‍ॅप्सचा देखील वापर करू शकता. या अ‍ॅप्समध्ये तुम्हाला तुमच्या परिसरातील हवामानाविषयी माहिती दिली जाणार आहे. या अ‍ॅप्समध्ये AccuWeather, Skymet Weather, Mausam (IMD अ‍ॅप) किंवा Google Weather यांचा समावेश आहे. हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुमच्या परिसरात हवामानाची काय परिस्थिती आहे. हे अ‍ॅप्स केवळ रिअल टाइम अलर्ट देत नाहीत तर तासाभराचे आणि आठवड्याचे अंदाज देखील दाखवतात. ज्यामुळे तुम्हाला एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल किंवा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर या वेदर अपडेटची मदत मिळू शकते.

Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये

अलर्ट ऑन करणं गरजेचं का आहे?

दरवर्षी, वादळ, वादळे आणि मुसळधार पावसामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये जीवित आणि वित्तहानी होते. जर लोकांना आधीच सूचना मिळाल्या तर घराबाहेर न पडणे, वाहन सुरक्षितपणे पार्क करणे, विद्युत उपकरणे बंद ठेवणे इत्यादी खबरदारी वेळेवर घेता येईल.

Web Title: You will get every weather update on your smartphone just do this setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून
1

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
2

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
3

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
4

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.