Amazon ची सर्विस झाली स्मार्ट आणि पावरफुल! आता ड्रोनने होणार तुमच्या iPhone ची डिलीव्हरी, या भागांत सुरु झाली सेवा
आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगेत उभं राहा किंवा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर त्याच्या डिलीव्हरीसाठी 4 ते 5 दिवस वाट बघा… या सर्व त्रासातून आता तुमची सुटका होणार आहे. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने एक नवीन सर्विस सुरु केली आहे. आता अॅमेझॉनवर आयफोन ऑर्डर केल्यानंतर 4 ते 5 दिवस डिलीव्हरी बॉयची वाट पाहण्याची गरज नाही. कारण आता आयफोनची डिलीव्हरी कोणताही डिलीव्हरी बॉय नाही तर ड्रोनद्वारे केली जाणार आहे. Amazon ने Prime Air ड्रोन सर्विस सुरु केली आहे. ही सर्विस स्मार्ट आणि पावरफुल असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता ही सर्विस iPhone सारख्या हाय-अँड स्मार्टफोन्स आणि अनेक डिव्हाईसची ड्रोनद्वारे डिलीव्हरी करणार आहे. यासाठी केवळ 1 तासांचा वेळ लागणार आहे.
Amazon ने अमेरिकेत Prime Air ड्रोन डिलीवरी प्रोग्राम अपग्रेड केला आहे. त्यामुळे आता ही सर्विस काही निवडक भागांमध्ये सुरु करण्यात आली आहे. जर तुम्ही टेक्सास किंवा अॅरिझोनामधील काही निवडक झोनमध्ये राहत असाल, तर हे तुमच्यासाठी पूर्णपणे बदल घडवून आणणारे ठरू शकते. कारण Prime Air ड्रोन डिलीवरी प्रोग्राम या भागात सुरु करण्यात आला आहे. ड्रोनद्वारे Apple iPhone, Samsung Galaxy फोन्स, AirPods, AirTags, आणि Ring डोरबेल सारखे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस ड्रोनद्वारे डिलीव्हर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिलीव्हरीसाठी Amazon त्यांच्या नवीन MK30 ड्रोनचा वापर करणार आहे. हे ड्रोन तुमच्या घराच्या यार्ड किंवा ड्राइववे सारख्या भागात जमीनीपासून 13 फूट उंचावरून डिलीव्हरी करणार आहे. Amazon च्या लिस्टमध्ये 60,000 हून प्रोडक्ट्स आहेत, जे ड्रोनद्वारे ऑर्डर केले जाऊ शकतात. यामध्ये केवळ गॅझेट्सच नाही तर Alpha Grillers किंवा Thermometer सारखे स्मार्ट किचन टूल्स देखील सहभागी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ऑर्डर 5 पौंड (सुमारे 2 किलो) पेक्षा हलकी असेल आणि तुमचा परिसर या सेवेसाठी पात्र असेल तरच डिलिव्हरी शक्य आहे.
प्रत्येक वातावरणात ड्रोन उडू शकत नाही. यासाठी Amazon ने 75 मिनटांपर्यंत वेदर फोरकास्ट सिस्टम तयार केली आहे, जो पहिला अंदाज लावणार आहे की ड्रोनव्दारे डिलीव्हरी केली जाऊ शकते की नाही. जर कोणत्याही कारणास्तव ड्रोनद्वारे डिलीव्हरी केली जाणार नसेल तर त्याबाबत ग्राहकांना आधीच माहिती दिली जाते.
जेव्हा तुम्ही Amazon वर खरेदी करता आणि चेकआउट पेजवर पोहोचता, तेव्हा तुमचे लोकेशन आणि प्रोडक्ट पात्र असल्यास, तुम्हाला ड्रोन डिलिव्हरीचा पर्याय दिसेल. तिथून तुम्ही तुमचा पसंतीचा डिलिव्हरी पॉइंट (जसे की यार्ड किंवा ड्राईव्हवे) निवडू शकता.