Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Android Battery Saver Mode: तुम्हाला माहिती असेलच प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर पर्याय असतो, ज्याचा वापर स्मार्टफोनची चार्जिंग अत्यंत कमी असेल तेव्हा केला जातो. स्मार्टफोनमधील बॅटरी सेव्हर मोडचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटे देखील आहेत. याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 01:21 PM
Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Follow Us
Follow Us:
  • बॅटरी सेव्हर ऑन करताच फोनचा परफॉर्मन्स कमी होतो आणि बॅकग्राउंडमधील अनेक ॲप्स मर्यादित केली जातात.
  • स्क्रीन ब्राइटनेस, रिफ्रेश रेट, लोकेशन, नेटवर्क आणि अलवेज-ऑन डिस्प्ले सारख्या फीचर्सवरही परिणाम होतो.
  • बॅटरी सेव्हर गरज असेल तेव्हाच वापरणे योग्य असून, सतत वापरल्यास परफॉर्मन्सवर परिणाम जाणवू शकतो.
Battery Saver in Android: प्रत्येक अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर नावाचे एक फीचर असते. जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी खूप कमी असते आणि आपल्याला दिर्घकाळ फोनची गरज असते, अशावेळी बॅटरी सेव्हर मोडचा वापर केला जातो. ज्यामुळे फोन जास्त काळ वापरला जाऊ शकतो. अनेकजण सतत फोनमधील बॅटरी सेव्हर मोडचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बॅटरी सेव्हर ऑन करताच फोनमध्ये असे कोणते बदल होतात, ज्यामुळे फोन आणखी काही काळ सुरु राहतो? चला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

अलवेज-ऑन डिस्प्ले बंद होतो

स्मार्टफोनमधील बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच अलवेज-ऑन डिस्प्ले, ऑटो सिंक आणि इतर काही फीचर्स देखील तात्पुरत्या स्वरुपात बंद केले जातात. यामुळे डिस्प्ले आणि बॅकग्राउंड प्रोसेस कमी बॅटरीचा वापर करतात आणि तुम्ही दिर्घकाळापर्यंत अगदी सहज स्मार्टफोनचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)

बॅकग्राउंड ॲप्स बंद होतात

जेव्हा तुम्ही अँड्रॉईडमध्ये बॅटरी सेव्हर मोड ऑन करता डिव्हाईसमधील बॅकग्राउंड ॲप्स त्वरित बंद केले जातात. यामागील कारण म्हणजे, बॅकग्राउंड ॲप्स सतत इंटरनेट, लोकेशन आणि प्रोसेसरचा वापर करतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. पण बॅकग्राउंड ॲप्स बंद केल्यास फोनमधील बॅटरीची बचत केली जाऊ शकते.

डिव्हाईसचा परफॉर्मंस कमी होतो

बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच तुम्हाला फोनचा परफॉर्मंस डाऊन वाटू शकतो. कारण बॅटरी वाचवण्यासाठी आणि फोनचा वापर दिर्घकाळ करता यावा, यासाठी सिस्टिम प्रोसेसरची स्पीड देखील कमी करू शकतो. तुम्ही निरीक्षण केलं असेल की फोनमध्ये बॅटरी सेव्हर ऑन असतो तेव्हा गेमिंग, व्हिडीओ एडिटिंग किंवा इतर काम करताना फोन फुल स्पीडमध्ये काम करत नाही.

लोकेशन आणि नेटवर्कसह इतर फीचर्सवर होतो परिणाम

काही स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर मोड ऑन करताच 5G नेटवर्कच्या जागी 4G नेटवर्क चालू केले जाते. याशिवाय, लोकेशन फीचर देखील बंद केले जाते. यामुळे बॅटरी सेव्ह केली जाते. मात्र यामुळे काही ॲप्समधील रियल-टाइम लोकेशन सर्विसवर परिणाम होतो.

स्क्रीन ब्राईटनेसमध्ये बदल होतो

बॅटरी सेव्हर ऑन करताच फोनची स्क्रीन ब्राईटनेस कमी केली जाऊ शकते आणि अनेक विजुअल इफेक्ट्स किंवा एनिमेशनवर देखील मर्यादा घातली जाते. काही स्मार्टफोन्समध्ये स्क्रीनचा रिफ्रेश रेट देखील कमी होतो, ज्यामुळे बॅटरी देखील कमी खर्च केली जाते.

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

चुकीचा वापर केल्यास होऊ शकतं स्मार्टफोनचं नुकसान

सहसा लोकं अँड्रॉईड फोनमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त बॅटरी असून देखील बॅटरी सेव्हर मोड चालू करतात. पण वारंवार असं केल्यास डिव्हाईस खराब होऊ शकतं आणि स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर देखील परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे असे मानणे आहे की असे केल्याने फोनच्या एकूण परफॉर्मंसवर परिणाम होतो. जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बॅटरी सेव्हर मोड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषत:, लांब प्रवासादरम्यान जेव्हा तुम्हाला चार्जिंग करण्याची सुविधा मिळत नाही, तुम्ही बॅटरी सेव्हर मोड वापरू शकता.

Web Title: How battery saver mode work in android smartphones wrong use can cause big loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.