या देशात YouTube बॅन! टीनएजर्ससाठी सोशल मीडिया पूर्णपणे बंद, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केले आहे. पण कंपनीने त्यांच्या या निर्णयातून YouTube ला वगळलं होतं. मात्र आता या बॅन करण्यात आलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये YouTube चा देखील समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आता ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णपणे बॅन करण्यात आलं आहे.
यापूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा या निर्णयातून YouTube ला वगळण्यात आलं होतं. मात्र आता देशाने YouTube वर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या यू-टर्नमुळे गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटसोबत कायदेशीर संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने हा निर्णय का घेतला आहे, याचं कारण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑस्ट्रेलियन इंटरनेट रेगुलेटर द्वारे जारी करण्यात आलेल्या एका अहवालात सांगण्यात आलं आहे की, 37% अल्पवयीन मुलांना YouTube वरील धोकादायक कंटेटचा सामना करावा लागला. हा आकडा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा खूप जास्त आहे. याच सगळ्याचा विचार करून आता देशातील सरकारने YouTube वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी या निर्णयाबाबत म्हटलं आहे की, “आता वेळ आली आहे की आम्ही या प्लॅटफॉर्मवर बंदी घालावी. ऑस्ट्रेलियन मुलांवर सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम होत आहे आणि आपण त्यांच्या हितासाठी कठोर कारवाई केली पाहिजे.” पंतप्रधानांनी देशातील पालकांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्यासोबत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर YouTube ने देखील प्रतिक्रिया दिली आहे. YouTube ने असे उत्तर दिले की त्यांचे प्लॅटफॉर्म प्रामुख्याने व्हिडिओ शेअर करण्यासाठी आहे आणि ते सोशल मीडिया म्हणून वर्गीकृत केले जाऊ नये. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, YouTube ही एक व्हिडिओ लायब्ररी आहे जी लोक टीव्हीवर देखील पाहू शकतात. ते सोशल मीडिया नाही.
जेव्हा गेल्यावर्षी सरकारने शिक्षकांमधील YouTube ची लोकप्रियता पाहता, त्याला बॅन केलं नव्हतं. मात्र त्यावेळी Meta, Snapchat आणि TikTok सारख्या प्लॅटफॉर्मने याचा विरोध केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की, YouTube मध्ये देखील इंटरॅक्टिव फीचर्स आणि एल्गोरिदम आधारित कंटेंट सजेशन सारखे अनेक सोशल मीडिया तत्व त्यामध्ये आहेत.
Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!
सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना आता YouTube चा वापर करता येणार नाही. आता केवळ शिक्षक आणि पालकच YouTube चा वापर करू शकतात. ऑस्ट्रेलियन प्रायमरी प्रिन्सिपल्स असोसिएशनच्या प्रमुख अँजेला फाल्केनबर्ग म्हणाल्या की शिक्षक नेहमीच योग्य कंटेंट निवडतील.