YouTube कि Instagram? कमाईसाठी कोणता प्लॅटफॉर्म ठरू शकतो फायदेशीर, 10 हजार व्यूजवर कोणं देतो जास्त पैसे?
सध्याच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच कमाईचे साधन आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांचे मनोरंजन देखील होते आणि त्यासोबच कमाई देखील केली जाऊ शकते. अनेक कंटेट क्रिएटर्स आणि इंफ्ल्युएंर्स व्हिडीओद्वारे मोठी कमाई करतात. कंटेंट क्रिएटर्सची वाढती संख्या आणि त्यांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे या उद्योगाला अब्जावधींची बाजारपेठ मिळाली आहे. कंटेट क्रिएटर्स आणि इंफ्ल्युएंर्सची सर्वात जास्त कमाई युट्यूब आणि इंस्टाग्रामद्वारे केली जाऊ शकते. पण बऱ्याचदा लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की युट्यूब आणि इंस्टाग्रामपैकी कोणता प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्सना जास्त पैसे देतो, याबाबत जाणून घेऊया.
जपानची सैर करण्यापासून ते नवीन स्कूटी खरेदी करण्यापर्यंत… iPhone 17 च्या किंमतीत करू शकता ही कामं
यूट्यूब दिर्घकाळापासून क्रिएटर्ससाठी एक विश्वसनिय प्लॅटफॉर्म बनला आहे. येथे कमाईचे सर्वात मुख्य माध्यम Google AdSense असते. जेव्हा तुमच्या चॅनेलवर 1000 सब्सक्राइबर आणि गेल्या 12 महिन्यांत 4000 तासांचा वॉचटाइम पूर्ण होतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसोबत जोडले जाता. यानंतर, तुम्ही तुमच्या व्हिडिओवर दिसणाऱ्या जाहिरातींमधून कमाई करण्यास सुरुवात करता.
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, यूट्यूब 10 हजार व्यूजवर सरासरी 1 ते 5 डॉलर म्हणजेच सुमारे 80 ते 400 रुपये देते. ही कमाई अनेक घटकांवर निर्भर असते. जसे की व्हिडिओचा प्रकार, प्रेक्षक कोणत्या देशाचे आहेत आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती आहेत. टेक्नोलॉजी, वित्त आणि शिक्षण श्रेणींमधील व्हिडिओ अनेकदा जास्त रेवेन्यू आणतात. त्यामुळे अशावेळी युजर्सची कमाई जास्त होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामद्वारे कमाई करण्याचा मार्ग थोडा वेगळा आहे. इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सना व्यूजसाठी डायरेक्ट पैसे देत नाही. इंस्टाग्रामच्या उत्पन्नाचा मोठा भाग ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सर्ड पोस्ट आणि रील्स बोनस प्रोग्राममधून येतो. तथापि, रील्स बोनस प्रत्येक देशात उपलब्ध नाही. भारतात, बहुतेक क्रिएटर्सचे उत्पन्न स्पॉन्सर्ड कंटेंट आणि एफिलिएट मार्केटिंगवर आधारित आहे.
ज्याप्रमाणे युट्यूब तुमच्या व्ह्युज आणि वॉच टाईमवर आधारित पैसे देते, मात्र इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सना व्ह्युजवर आधारित पैसे अगदी डायरेक्ट देत नाही. म्हणजेच इंस्टाग्रामवर तुमचे व्ह्युज वाढल्यास तुम्हाला पैसे दिले जात नाहीत. मात्र जर तुमचं अकाऊंट प्रसिद्ध असेल, अशावेळी जास्त व्ह्युजनंतर ब्रँड्स तुमची प्रोडक्ट प्रमोशनसाठी निवड करतात. फक्त एका पोस्ट किंवा रीलमधून हजारो ते लाखो रुपये कमवणे देखील शक्य आहे.
तुम्हाला सोशल मीडियाद्वारे कमाई करायची असेल तर इंस्टाग्राम एक चांगला मार्ग ठरू शकतो. यासाठी तुम्हाला मोठ्या फॉलोइंगची देखील गरज नाही. मात्र जर तुमची रिल व्हायरल होत असेल तर ब्रँड्स तुमच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तर यूट्यूबवर, AdSense मधून कमाई सुरू करण्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करावे लागतील.
जर आपण फक्त 10 हजार व्ह्यूजबद्दल बोललो तर यूट्यूब थेट पैसे देते तर इंस्टाग्राम देत नाही. म्हणूनच, यूट्यूब व्ह्यू-आधारित कमाईमध्ये अधिक फायदेशीर आहे. पण जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट वेगाने वाढत असेल आणि तुम्हाला ब्रँड डील मिळत असतील, तर तुमची कमाई यूट्यूबपेक्षा खूप जास्त असू शकते.