भारतीय टीमचा नवा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - Instagram)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगाशी आला असून भारताने सर्वच गोलंदाजांना रडवले. सर्वांनीच आज चांगला खेळ दाखवत मोठी धावसंख्या उभारली.
अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके झळकावली
आजच्या सामन्यात भारताकडून दोन फलंदाज अर्धशतके झळकावू शकले. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या हे अर्धशतके झळकावणारे दोन फलंदाज होते. डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्माने १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ३० चेंडूत ५५ धावा काढल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने २१७.३९ च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत नाबाद ५० धावा काढल्या.
या फलंदाजांनीही केली कमालीची कामगिरी
फक्त अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याच नाही तर संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनीही झिम्बाब्वेविरुद्ध चांगली कामगिरी केली. डावाची सुरुवात करताना सॅमसनने १५ चेंडूत २४ धावा केल्या, तर इशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा केल्या, कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत ३३ धावा केल्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माने १६ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. एकंदरीत आज सर्वच फलंदाजांनी कमाल कामगिरी केल्याने धावांचा डोंगर उभा राहिला.
झिम्बाब्वेच्या या गोलंदाजांनी यश मिळवले
आजच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या एकूण चार गोलंदाजांनी यश मिळवले. यामध्ये रिचर्ड अंगारवा, ब्लेसिंग मुझारबानी, टिनोटेंडा मपोसा आणि सिकंदर रझा यांचा समावेश आहे. अंगारवाने सूर्यकुमार यादवला, मुझारबानीने संजू सॅमसनला, मपोशाने अभिषेक शर्माला आणि रझा यांनी इशान किशनला बाद केले.






