भारतातील या ठिकाणी घ्या Adventure Sports ची मजा, पॅराग्लायडिंग ते रिव्हर राफ्टिंगपर्यंत... मिळेल कधीही न विसरता येणारा अनुभव!
नैसर्गिक सौंदर्य, विविधता, सांस्कृती आणि परंपरा या सर्व गोष्टींनी आपला भारत देश संपन्न आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व गोष्टींसोबतच भारत साहसी खेळांसाठी देखील ओळखला जातो. पॅराग्लायडिंग ते रिव्हर राफ्टिंगपर्यंत अनेक साहसी खेळ भारतात खेळले जातात. त्यामुळे भारत देश साहसी खेळ आवडणाऱ्या लोकांसाठी स्वर्गच आहे, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही.
Burj-al-Arab: या देशात आहे जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल! एका रात्रीचे भाडे वाचून तुम्हीही अवाक व्हाल
भारतात उंच पर्वत आहेत, वेगाने वाहणाऱ्या नद्या आहे, निळशार आकाश आहे, त्यामुळे भारत नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. तुम्हाला उंच पर्वतावर चढायचं असेल किंवा नद्यांच्या वेगवान प्रवाहात राफ्टिंग करायचे असेल किंवा आकाशात उडायचे असेल, तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न भारतात पूर्ण करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
योग राजधानी म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश हे साहसी खेळांसाठी देखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे गंगा नदीवर रिव्हर राफ्टिंगचा अद्भुत अनुभव तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत घेऊ शकता. राफ्टिंग व्यतिरिक्त, बंजी जंपिंग, कॅम्पिंग आणि ट्रेकिंग सारख्या खेळांचा आनंद देखील तुम्हाला ऋषिकेशमध्ये घेता येतो. ऋषिकेशमध्ये साहसी खेळांसाठी अनेक प्रशिक्षित मार्गदर्शक आणि संस्था आहेत, जे तुम्हाला सुरक्षित आणि रोमांचक अनुभव देतात.
हिमाचल प्रदेशच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ मनाली, त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पॅराग्लायडिंगचा अनुभव घेणे हा एक संस्मरणीय क्षण असू शकतो. उंच टेकड्यांवरून पॅराग्लायडिंग
करताना तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. हिवाळ्याच्या हंगामात, मनालीत स्कीइंगचा आनंदही घेता येतो. याशिवाय, येथे ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन बाइकिंग सारख्या अॅक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहेत.
सुंदर समुद्रकिनारे आणि नाईटलाइफसाठी ओळखले जाणारे गोवा हे साहसी खेळांसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे. येथे स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेणे एक अद्भुत साहस असू शकते. समुद्राच्या खोलवर उतरल्यावर तुम्हाला रंगीबेरंगी मासे आणि खडक दिसतात. याशिवाय, गोव्यात जेट स्कीइंग, पॅरासेलिंग आणि वॉटर स्कीइंग सारख्या अॅक्टिव्हिटीचा आनंद घेता येतो.
कारने Long Trip ला जाण्याचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर कराल पश्चाताप
बर्फाळ शिखरे आणि उंच पर्वतांसाठी ओळखले जाणारे लेह-लडाख साहसी खेळांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे माउंटन बाइकिंगचा अनुभव घेणे एक साहस असू शकते. लेह-लडाखमध्ये अनेक ट्रेकिंग रूट्स आहेत, जेथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य आणि शांततेत तुमचा क्वालिटी वेळ घालवू शकता. याशिवाय, येथे रिव्हर राफ्टिंग आणि कॅम्पिंगचा आनंदही घेता येतो.
स्वच्छ निळ्या पाण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाणारे अंदमान आणि निकोबार बेटे साहसी खेळांसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहेत. येथे समुद्रात फिरणे आणि स्नॉर्कलिंग करणे हा एक अविस्मरणीय क्षण असू शकतो. समुद्राच्या आत फिरताना तुम्हाला सागरी जीवन जवळून पाहता येते. याशिवाय, स्कूबा डायव्हिंग, जेट स्कीइंग आणि कायाकिंग सारख्या अॅक्टिव्हिटीचा आनंद येथे घेता येतो.