Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?

Indian Temple Unique Tradition : भारतामध्ये अशी काही खास मंदिरे आहेत जिथे प्रसाद खाणे किंवा घरी नेणे निषिद्ध मानले जाते. श्रद्धा आणि परंपरेनुसार येथे प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2025 | 08:21 AM
भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?

भारतातील 5 रहस्यमय मंदिर जिथला प्रसाद खाणं किंवा घरी घेऊन जाणं मानलं जात अशुभ; नक्की कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील काही मंदिरांमध्ये प्रसाद खाणे किंवा घरी नेणे वर्ज्य मानले जाते, कारण तेथील श्रद्धा आणि परंपरा वेगळ्या आहेत.
  • भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे प्रसाद केवळ देवासाठी अर्पण केला जातो, भाविकांनी तो ग्रहण करू नये असा नियम आहे.
  • अशा मंदिरांमध्ये दर्शन करताना स्थानिक नियम आणि श्रद्धांचा आदर करणे हीच खरी भक्ती मानली जाते.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे वेगवेगळ्या धर्मांचे, संस्कृतींचे आणि परंपरांचे पालन करणारे लोक एकत्र राहतात. त्यामुळेच भारताला “मंदिरांचा देश” असेही म्हटले जाते. देशभरात लहान-मोठी मिळून सुमारे सात लाखांहून अधिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची पूजा पद्धत, श्रद्धा आणि नियम वेगवेगळे असतात. आजच्या या लेखात आपण भारतातील अशा ५ खास मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे भाविकांना प्रसाद खाण्यास किंवा घरी नेण्यास मनाई आहे. या ठिकाणी प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो.

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

मेहंदीपूर बालाजी मंदिर, राजस्थान

राजस्थानमध्ये असलेले हनुमानजींचे मेहंदीपूर बालाजी मंदिर नकारात्मक शक्ती आणि बाधांपासून मुक्ती देणारे मानले जाते. येथे बालाजींना बूंदीचे लाडू, तर भैरव बाबांना उडीद डाळ आणि भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो.
स्थानिक श्रद्धेनुसार, या मंदिरातील प्रसाद खाणे किंवा घरी नेणे अशुभ मानले जाते. असे केल्यास नकारात्मक शक्ती आपला पाठलाग करतात, अशी भाविकांची ठाम धारणा आहे. त्यामुळे येथे प्रसाद फक्त देवाला अर्पण केला जातो.

माँ कामाख्या देवी मंदिर, आसाम

गुवाहाटी येथे स्थित माँ कामाख्या देवी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. देवीच्या रजस्वला काळात (अंबुबाची योग) सलग तीन दिवस मंदिर बंद ठेवले जाते. या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश तसेच प्रसाद घेण्याची परवानगी नसते. मान्यतेनुसार, या दिवसांत देवी विश्रांती घेतात, त्यामुळे प्रसाद ग्रहण करणे वर्ज्य मानले जाते.

उज्जैन काल भैरव मंदिर, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील काल भैरव मंदिरात भैरव बाबांना मद्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. भारतातील हे एकमेव असे मंदिर आहे जिथे ही प्रथा आजही सुरू आहे. श्रद्धेनुसार, हे मद्य फक्त देवासाठी असते. भाविकांनी ते ग्रहण करू नये, असा कडक नियम आहे. हा नियम मोडल्यास आयुष्यात अडचणी आणि संकटे येतात, असे मानले जाते.

नैना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिर हेही एक शक्तिपीठ आहे. येथे देवीला फळे, फुले आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. मान्यतेनुसार, या मंदिरातील प्रसाद मंदिर परिसरातच ग्रहण करावा. तो घरी नेणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे भाविक मंदिरातच प्रसाद स्वीकारतात.

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

कोलार कोटिलिंगेश्वर मंदिर, कर्नाटक

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोटिलिंगेश्वर मंदिर हे असंख्य शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. येथे शिवलिंगांची संख्या शेकडो-हजारो नसून तब्बल एक कोटी असल्याचे मानले जाते.
या मंदिरात पूजेनंतर मिळणारा प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो. तो खाणे किंवा घरी नेणे मनाई आहे. विशेषतः शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद अजिबात ग्रहण करू नये, कारण तो चंडेश्वराला समर्पित असतो, अशी श्रद्धा आहे. ही सर्व मंदिरे आपापल्या श्रद्धा, नियम आणि परंपरांसाठी ओळखली जातात. त्यामुळे अशा ठिकाणी दर्शनाला जाताना तेथील नियमांचे पालन करणे, हीच खरी भक्ती मानली जाते.

Web Title: 5 mysterious temples in india where prasad is considered inauspicious to eat or take home travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • Religious Places
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा
1

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

चमचमीत आणि मजेदार… मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?
2

चमचमीत आणि मजेदार… मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…
3

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा
4

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.