Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Burj-al-Arab: या देशात आहे जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल! एका रात्रीचे भाडे वाचून तुम्हीही अवाक व्हाल

बुर्ज अल अरबची उंची 321 मीटर आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात उंच हॉटेल्सपैकी एक आहे. बुर्ज अल अरब आपल्या पाहुण्यांना अनोख्या आणि खास सुविधा देते. हे हॉटेल बांधण्यासाठी सुमारे 1 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2025 | 12:18 PM
Burj-al-Arab: या देशात आहे जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल! एका रात्रीचे भाडे वाचून तुम्हीही अवाक व्हाल

Burj-al-Arab: या देशात आहे जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल! एका रात्रीचे भाडे वाचून तुम्हीही अवाक व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

आतापर्यंत तुम्ही 3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये गेला असाल. पण तुम्ही कधी 10 स्टार हॉटेलमध्ये गेला आहात का? आज आम्ही तुम्हाला जगातील एकमेक 10 स्टार हॉटेलबद्दल सांगणार आहोत. हे 10 स्टार हॉटेल दुबईमध्ये स्थित आहे. आधुनिकता, लक्झरी आणि उंच इमारत अशा वैशिष्ट्यांनी भरलेल्या या हॉटेलचं नाव आहे बुर्ज-अल-अरब. हे हॉटेल केवळ दुबईमध्येच नाही तर संपूर्ण जगात लक्झरीचे प्रतीक मानले जाते. बुर्ज-अल-अरब हे जगातील एकमेक 10 स्टार हॉटेल असल्याचं सांगितलं जातं.

कारने Long Trip ला जाण्याचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर कराल पश्चाताप

बुर्ज अल अरब हे सरकारी मालकीच्या लक्झरी हॉटेल चेन जुमेराह ग्रुपच्या मालकीचे आहे. हे हॉटेल त्याच्या भव्यतेसाठी, अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि अतुलनीय सुविधांसाठी ओळखले जाते. ही इमारत प्रचंड उंच आणि आकर्षक आहे. या हॉटेलमधील रुमचे भाडे देखील खूप जास्त आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

बुर्ज अल अरबची वास्तुकला आणि उंची

बुर्ज अल अरबची उंची 321 मीटर आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात उंच हॉटेल्सपैकी एक आहे. या हॉटेलचे बांधकाम 1998 मध्ये पूर्ण झाले आणि तेव्हापासून ते दुबईच्या अभिमानाचे प्रतीक बनले आहे. हॉटेलची रचना समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जहाजासारखी आहे. हे हॉटेल एका कृत्रिम बेटावर बांधले आहे. हे बेट खास हॉटेलच्या बांधकामासाठी तयार करण्यात आले होते. त्याची वास्तुकला इतकी आकर्षक आहे की ती दूरवरूनही लोकांचे लक्ष वेधून घेते.

भव्य सुट्स आणि अंतर्गत सजावट

बुर्ज अल अरबमध्ये एकूण 202 डुप्लेक्स सुइट्स आहेत, जे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. हॉटेलच्या आतील भागात 24 कॅरेट सोन्याच्या पानांची सजावट, आकर्षक झुंबर आणि दोन मजल्यांवर पसरलेले प्रशस्त सुइट्स आहेत. प्रत्येक सुइटमध्ये पाहुण्यांना एक वैयक्तिक बटलर मिळतो. हॉटेलचे इंटीरियर इतके सुंदर आहे, की अगदी पाहताच क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.

विशेष वैशिष्ट्ये आणि सेवा

बुर्ज अल अरब आपल्या पाहुण्यांना अनोख्या आणि खास सुविधा देते. हॉटेलमध्ये राहणाऱ्या खास पाहुण्यांसाठी हेलिकॉप्टर आणि रोल्स रॉयस कारची सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय, हॉटेलमध्ये जगातील काही सर्वोत्तम रेस्टॉरंट्स आहेत, जे विविध प्रकारचे पदार्थ त्यांच्या पाहुण्यांसाठी तयार करतात. हॉटेलमध्ये एक मोठे मत्स्यालय देखील आहे, जे पाहुण्यांना एक अनोखा अनुभव देते.

बुर्ज अल अरबचा बांधकाम खर्च

बुर्ज अल अरब सुमारे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8 हजार कोटी रुपये) खर्चून बांधण्यात आला. ही किंमत त्याची भव्यता आणि अनन्य वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करते. हॉटेलच्या बांधकामात उच्च दर्जाचे साहित्य आणि तंत्रज्ञान वापरले गेले आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक बनले आहे.

गोवा आणि शिमल्याला विसरून जाल, अवघ्या अडीच तासात करता येईल Qatar चा प्रवास! ही आहेत प्रमुख ठिकाणं

गर्दीच्या हंगामात राहण्याचा खर्च

बुर्ज अल अरबमध्ये राहण्याचा अनुभव खूप खास आहे, पण हा अनुभव खूप महागडा देखील आहे. गर्दीच्या हंगामात, या हॉटेलमध्ये एक रात्री मुक्काम करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. हॉटेलमधील लक्झरी आणि विशेष सुविधा लक्षात घेता ही किंमत वाजवी मानली जाते. हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांना एक अनोखा अनुभव मिळतो जो त्यांना आयुष्यभर लक्षात राहतो.

Web Title: Burj al arab is the only 10 star hotel in the world which is located in dubai travel news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Dubai
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
1

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…
3

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर
4

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.