गोवा आणि शिमल्याला विसरून जाल, अवघ्या अडीच तासात करता येईल Qatar चा प्रवास! ही आहेत प्रमुख ठिकाणं
तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आम्ही अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही अवघ्या अडीच तासात प्रवास करू शकता. जर कोणी परदेशातील ठिकाणांना भेट द्यायची यादी केली असेल तर त्या यादीमध्ये दुबईचा उल्लेख नक्की असणार आहे. दुबईसोबतच आता अनेकजण कतारला भेट देण्याचा देखील विचार करत आहेत. लोक दर महिन्याला कतारला भेट देण्याचे नियोजन करत आहेत. तुम्ही देखील परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कतारला भेट देऊ शकता. तुमचा हा प्रवास अवघ्या अडीच तासांत पूर्ण होणार आहे.
इतकेच नाही तर पूर्वी लोक वीकेंडला गोव्याला आणि शिमल्याला जात होते, पण आता लोक कतारला जाऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे दिल्ली ते कतार पर्यंतच्या फ्लाइटची वेळ आणि तेथील हवामान आणि पायाभूत सुविधा. यामुळे, लोकांनी आता त्यांच्या वीकेंड किंवा हॉलिडे प्लॅनमध्ये कतारचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही देखील तुमचा विकेंड स्पेंड करण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करू शकता.(फोटो सौजन्य – Pinterest)
कतार देश खरोखरच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे, विशेषतः आखाती देशात. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक कतारला भेट देतात आणि तेथील सौंदर्य, संस्कृती आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अनुभव घेतात. ताज्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, मध्य पूर्वेतील कतारला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 137% ने वाढ झाली आहे. कतार एअरवेजला 2024 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट एअरलाइन म्हणून घोषित करण्यात आले, तर दोहाच्या हमाद इंटरनॅशनलनेही जगातील सर्वोत्तम विमानतळ हा बहुमान मिळवला.
जर आपण नवी दिल्लीहून कतारला जाण्याचा विचार केला तर हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंंत फायद्यचा ठरणार आहे. नवी दिल्लीहून तुम्ही एअरलाईन्सद्वारे कतारला जाऊ शकता. नवी दिल्ली ते दोहा, कतारसाठी 16 ते 17 हजार रुपयांचा फ्लाइट खर्च येणार आहे. म्हणजे 34 हजार रुपयांत तुम्ही ये-जा करू शकता. याशिवाय तुम्ही हॉटेलमध्ये तीन दिवस राहिल्यास हा खर्च 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. एकूणच, कमी वेळेत तुम्हाला चांगल्या सहलीचे नियोजन करायचे असेल तर कतार तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
दोहा: कतारची राजधानी आणि सर्वात मोठे शहर, आधुनिक पायाभूत सुविधा, शॉपिंग मॉल्स आणि सांस्कृतिक आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे. दोहाच्या विमानतळाची गणना जगातील सर्वोत्तम विमानतळांमध्ये केली जाते.
कतार म्युझियम : कतारची संस्कृती, इतिहास आणि कला दाखवणारे जगप्रसिद्ध संग्रहालय.
Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण
अल जानोब स्टेडियम: एक आधुनिक स्टेडियम जे फुटबॉल सामने आणि इतर क्रीडा स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे, कतार सरकारने व्हिसा धोरणे सुलभ करणे, नवीन पर्यटन स्थळे विकसित करणे आणि पर्यटनामध्ये गुंतवणूक करणे यासह अनेक पावले उचलली आहेत.