सुरक्षित देशांची यादी आली समोर; अमेरिका राहिला मागे तर भारत-पाकिस्तानने घेतली आघाडी, प्रथम स्थानी कोणी मारली बाजी?
प्रवास म्हटला की, आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही हे पाहणे फार महत्त्वाचे ठरते, विशेषतः तेव्हा जेव्हा आपण परदेशी पर्यटन करत असतो. प्रवास जितका महत्त्वाचा आहे तितकीच सुरक्षितताही महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जे पर्यटकांसाठी सुरक्षित मानले जातात. अलीकडेच “क्राउडसोर्स्ड डेटा प्लॅटफॉर्म नुम्बेओ” ने एक सर्वेक्षण केले असून त्यांनी गुन्हेगारीच्या दरांवर आधारित २०२५ सालातील जगातील सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. म्हणजेच या यादीत नमूद केलेल्या देशात तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय किंवा भीतीशिवाय ट्रॅव्हल करू शकता आणि पर्यटनाचा आनंद लुटू शकता. चला या यादीत भारताची अन्य देशाची स्थिती काय ते जाणून घेऊया.
या देशाने मारली प्रथम स्थानी बाजी
नुम्बेओ नावाच्या जागतिक रेटिंग एजन्सीने जाहीर यादीनुसार, अँडोरालाने सुरक्षित देशांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. ८४.७ गुणांसह २०२५ सालासाठी हा देश सर्वात सुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अँडोरा हा युरोपमधील सहावा सर्वात लहान देश आहे आणि जगातील १६ वा सर्वात लहान देश आहे. अशा परिस्थितीत, या देशात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी फिरणे सर्वात सुरक्षित मानले जाते.
सुरक्षित देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिराती (UAE) 84.5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, संयुक्त अरब अमिराती (UAE) हे राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे UAE पर्यटन क्षेत्रात आपला विस्तार करत आहे आणि हा देश हळूहळू प्रवासाची आवड असलेल्या लोकांची पहिली पसंती बनत आहे. जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा अशा अनेक गोष्टी इथे पाहण्याजोग्या आहेत. दरवर्षी भारत आणि परदेशातून लाखो पर्यटक इथे येत असतात. एकंदरीत, या देशात प्रवास केल्याने लोकांना सुरक्षित वाटते.
सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत ८४.२ गुणांसह कतारला जगातील तिसरा सर्वात सुरक्षित देश घोषित करण्यात आले आहे. जिथे येणारे पर्यटक सुरक्षित वाटतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, पश्चिम आशियातील हा देश त्याच्या आधुनिक वास्तुकला, उंच इमारती आणि भव्य शॉपिंग मॉल्ससाठी ओळखला जातो.यासोबतच, येथे अनेक प्रकारची संग्रहालये आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून येतात. इथे दोहा कॉर्निश नावाचा एक सुंदर समुद्रकिनाराही आहे जिथे तुम्ही उत्तम वेळ घालवू शकता. इथे तुम्हाला वाॅटर स्पोर्ट्सचीही मजा लुटता येईल.
रहस्यमयी वातावरण, प्राचीन लेण्या; महाभारताशी संबंध अन् पांडव फॉल्सना कधी भेट दिलीत का?
नुम्बेओच्या सुरक्षित देशांच्या यादीत तैवान ८२.९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. सुरक्षित देशांच्या यादीत ओमान ८१.७ गुणांसह पाचव्या स्थानावर, आयल ऑफ मॅन ७९.० गुणांसह सहाव्या स्थानावर, हाँगकाँग ७८.५ गुणांसह सातव्या स्थानावर, आर्मेनिया ७७.९ गुणांसह आठव्या स्थानावर, सिंगापूर ७७.४ गुणांसह नवव्या स्थानावर आणि जपान ७७.१ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
यादीत भारताची काय स्थिती?
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या नुम्बेओच्या नवीन रँकिंग अहवालात भारताला २०२५ पर्यंत भेट देण्यासाठी जगातील ६६ व्या क्रमांकाचा सर्वात सुरक्षित देश म्हणून स्थान देण्यात आले आहे, हा अंक अमेरिकेपेक्षा पुढे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, २०२५ च्या जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत अमेरिका ८९ व्या क्रमांकावर आहे. तर या यादीत, पाकिस्तान ५६.३ गुणांसह ६५ व्या स्थानावर आहे.