(फोटो सौजन्य – Pinterest)
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या सौंदर्यमूळे फार चर्चित आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणाविषयी माहिती सांगत नसून आज आम्ही तुम्हाला या लेखात देशातील काही अनोख्या हॉटेल्सविषयी माहिती सांगत आहोत जिथले सौंदर्य आणि अद्भुत अनुभव तुम्हाला इतर कुठेही घेता येणार नाही. कुठेही फिरायला जायचे म्हटले की, आपण राहण्याच्या व्यवस्थेचा प्रथम विचार करतो. कोणतेही हॉटेल जर केवळ स्वच्छता, खाण्यापिण्यासाठीच नव्हे तर त्याच्या विशिष्टतेसाठी देखील प्रसिद्ध असेल तर ते सहलीचे आकर्षण आणखीन वाढते.
रहस्यमयी वातावरण, प्राचीन लेण्या; महाभारताशी संबंध अन् पांडव फॉल्सना कधी भेट दिलीत का?
पाण्यात तरंगतात हॉटेल
उत्तराखंडमधील टिहरी येथे बांधलेली फ्लोटिंग हॉटेल्स झोपड्यांच्या आकारात बांधले गेले आहेत. परंतु येथील सुविधा तुम्हाला एका आलिशान हॉटेलची अनुभूती देतील. या झोपड्या तलावाच्या मध्यभागी बांधल्या आहेत आणि येथे तुम्हाला वाय-फाय, टेलिव्हिजन, एअर कंडिशनिंग सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
इथे घेता येईल वाइल्डलाइफ दृश्यांचा आनंद
जंगलात बनले आहे हॉटेल
राजस्थानमध्ये असेच आणखी एक अनोखे हॉटेल आहे, जे जगातील ५० अनोख्या हॉटेल्सच्या यादीत समाविष्ट आहे. या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे ते शहरात बांधलेले नाही तर पाली जिल्ह्यातील जंगलाच्या मध्यभागी आहे. येथील स्थानिक लोक या हॉटेलमधील पाहुण्यांना दूध, भाज्या इत्यादी पोहोचवतात. यामुळे पाहुण्यांना स्थानिक लोकांसह जंगलाला भेट देण्याची संधी मिळते.