Travel Guide: मोठ्या खर्चामुळे प्रवासाची आवड पूर्ण होत नाहीये? हे मनी सेविंग हॅक्स तुम्हाला करतील मदत
अनेकांना प्रवास करायला आवडतं. बरेच लोक स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी प्रवास करतात, तर काही लोक त्यांच्या छंदांसाठी विविध ठिकाणे एक्सप्लोअर करतात. प्रत्येक व्यक्तिला प्रवास करायला आवडतो. काहींना शांत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करण्याची इच्छा असते, तर काहींना गर्दीची ठिकाणं एक्सप्लोअर करायला आवडतात.
प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपलं बजेट वेगळं असतं. काही ठिकाणं अशी असतात जी आपण अगदी कमी पैशात फिरू शकतो. पण काही ठिकाणी जाण्यासाठी बराच खर्च होतो. त्यामुळे अनेकांना त्यांची प्रवासाची आवड पूर्ण करता येत नाही.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बऱ्याचदा प्रवासाची बाब पैशावर अडकते, कारण प्रवासाचा खर्च खूप जास्त असतो आणि प्रत्येकाला इतका खर्च करणे शक्य नसते. प्रवासाची इच्छा मात्र मनात कायम असते. अशा परिस्थितीत, काही मनी सेविंग हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचा छंद पूर्ण करू शकता. प्रवासाचा खर्च विचारपूर्वक केला तर तुमची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना पैशांमुळे प्रवासाची आवड पूर्ण करता येत नसेल, तर मनी हॅक्स तुमची मदत करणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
ट्रॅवल एडवाइजरची मदत घ्या- ट्रॅवल एडवाइजर नवीनतम तंत्रज्ञान आणि नियमांसह अपडेट राहतात. हे कोणत्याही विशेष पैसे बचत स्कीम किंवा पद्धतींबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतात. ज्यामुळे प्रवासावरील अनावश्यक खर्च वाचविण्यात मदत होते.
फ्लेक्सिबल व्हा – डेस्टिनेशनसाठी फ्लेक्सिबल रहा. एका डेस्टिनेशनवर जाण्याबद्दल अडून राहू नका. अतिशय लोकप्रिय किंवा मान्यताप्राप्त पर्यटन स्थळ नसलेले ठिकाण निवडा. त्यामुळे तिकीट मिळणे सोपे होते. बुकिंगच्या तारखांसह फ्लेक्सिबल रहा. आठवड्याच्या शेवटी किंवा लांब सुट्टीचे नियोजन करण्याऐवजी, आठवड्याच्या मध्यभागी सुट्टीचे नियोजन करा किंवा ऑफ-सीझन सुट्टीचे ठिकाण निवडा. त्यामुळे तिकिटांचे दर कमी होतात आणि गर्दीही कमी होते.
अॅडव्हान्स बुकींग करा – निघण्याच्या तारखेपूर्वी शक्य तितके अॅडव्हान्स बुकींग करा. उशीरा बुकिंगसाठी जास्त पैसे आकारले जातात.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अपडेट राहा – तुम्हाला नवीनतम बातम्या आणि तंत्रज्ञानासह अपडेट ठेवणाऱ्या प्रवासी वेबसाइट आणि ॲप्सशी कनेक्ट रहा. ट्रॅवल इंश्योरेंस घ्या.
क्रेडिट कार्डवर अशा अनेक ऑफर आहेत ज्यात तुम्ही प्रवासावर बचत करू शकता. या ऑफर्सचा फायदा घ्या.
भौतिक गोष्टींकडे आकर्षित होण्याऐवजी, अनुभवांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांचा आनंद घ्या.
अनावश्यक खरेदी करू नका. शक्य तिथे नेगोशिएट करा. जर तुम्ही बार्गेनिंग करून काही पैसे वाचवू शकत असाल तर अजिबात संकोच करू नका.
हॉटेल बुकींग करताना ऑफर्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही कमी पैशांत बुकींग करू शकाल.