मैत्रिणीसाठी बॅचलर पार्टी प्लॅन करताय? तुमच्या बकेट लिस्टमध्ये आत्ताच अॅड करा ही बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन
लग्नसराई सुरु झाली आहे. प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय होण्याासाठी काही ना काही प्लॅन करत असतात. लग्नाचा समारंभ एका दिवसाचा असला तरी त्याची प्लॅनिंग अनेक महिने आधीच सुरु झालेली असते. लग्नापूर्वी अनेकांना त्यांच्या बॅचलोरेट पार्टीची उत्सुकता असते. बॅचलोरेट पार्टी ही लग्नसराईच्या समारंभाची सुरुवात मानली जाते. गेल्या काही काळापासून वधू-वरांमध्ये बॅचलोरेट पार्टीची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. बॅचलोरेट पार्टीवेळी वधू आणि वर लग्नापूर्वी त्यांच्या मित्रांसोबत आनंदाचे काही क्षण घालवतात.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या मित्राचं लग्न असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही देखील बॅचलोरेट पार्टी प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्स घेऊन आलो आहोत. इथे तुम्ही तुमच्या मित्रासाठी किंवा मैत्रिणासाठी बॅचलोरेट पार्टी प्लॅन करू शकता. आणि लग्नापूर्वी त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवू शकता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार या ठिकाणांना भेट देऊन सुट्टीचा आनंद घेऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमच्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी बॅचलोरेट पार्टी आयोजित करायची असेल, तर तुम्ही यासाठी श्रीलंकेची निवड करू शकता. शेजारील देश श्रीलंकेत तुम्ही शांत समुद्र किनारे आणि आकर्षक पर्वत यांचे सौंदर्य अनुभवत तुमची बॅचलोरेट पार्टी एन्जॉय करू शकता. श्रीलंका हे संस्कृतीने समृद्ध गावांसाठी ओळखले जातात. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक इथे भेट देतात. हा देश बॅचलोरेट पार्टीसाठी एक उत्तम जागा आहे.
भूतान हा भारताच्या शेजारील सुंदर देश आहे. भूतान पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे कारण तुम्ही इथे कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता. या बजेट फ्रेंडली डेस्टिनेशनमध्ये तुम्हाला अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी तुम्ही हिमालयाच्या पर्वतरांगा, शांत रिसॉर्ट्स आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत तुमच्या बॅचलोरेट पार्टीचं आयोजन करू शकता.
थायलंड देखील बॅचलोरेट पार्टीसाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतो. बेटे, शांत समुद्रकिनारे, स्नॉर्कलिंग, खरेदी आणि बजेट-फ्रेंडली वातावरण यामुळे बॅचलोरेट पार्टीसाठी थायलंड योग्य ठिकाण आहे. इथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करू शकता.
जेव्हा जेव्हा प्रवासाचा विचार येतो तेव्हा व्हिएतनामला लोकांची पहिली पसंती दिली जाते. सुंदर समुद्रकिनारे, आकर्षक वास्तुकला आणि अप्रतिम संस्कृतीमुळे व्हिएतनाम बॅचलोरेट पार्टीसाठी योग्य ठिकाण ठरेल.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बाली हे जगभरात पर्यटनासाठी आवडते ठिकाण आहे. स्वच्छ पाणी, सोनेरी समुद्रकिनारे आणि परवडणाऱ्या किमतींमुळे तुम्ही येथे अविस्मरणीय बॅचलोरेट पार्टीचा आनंद घेऊ शकता.
बॅचलोरेट पार्टीसाठी मलेशिया देखील एक उत्तम ठिकाण आहे. तुमची पार्टी अविस्मरणीय बनवण्यासाठी इथले खाद्यपदार्थ, खरेदी, मनोरंजन पुरेसे आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही इथे खूप मजा करू शकता.