चला काही तुफानी करूया! ही आहेत जगातील प्रसिद्ध पॅराग्लायडिंग डेस्टिनेशन्स, अविस्मरणीय ठरेल तुमचा अनुभव
अनेकांना ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंग सारख्या साहसी उपक्रमांमध्ये सहभागी व्हायलं आवडतं. यामुळे आपल्याला एक नवीन अनुभव मिळतो. अशाच साहसी उपक्रमांपैकी एक म्हणजे पॅराग्लायडिंग. जगात आणि भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जी पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहेत. उंच आकाशातून निसर्ग सौंदर्य पाहायला प्रत्येकालाच आवडेल. जर तुम्हाला पॅराग्लायडिंगची आवड असेल आणि तुमची सुट्टी अशा ठिकाणी घालवायची असेल जिथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेता येईल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हिवाळ्यात पोखरा ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथे पॅराग्लायडिंग करताना तुम्हाला हिमालयातील सुंदर पर्वतरांगा आणि सरोवर पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. पावसाळ्यामुळे हे ठिकाण जून ते सप्टेंबर या काळात पॅराग्लायडिंगसाठी बंद असते. त्यामुळे तुम्ही या काळात पोखरामध्ये पॅराग्लायडिंग करू शकत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
सिक्कीम त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. तुम्हाला पॅराग्लायडिंग करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही यासाठी योग्य ठिकाण शोधत असाल तर तुम्ही सिक्किमची निवड करू शकता. येथे तुम्ही पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. टेक ऑफ आणि लँडिंगसाठी येथे उत्तम ठिकाणे आहेत. पॅराग्लायडिंग दरम्यान तुम्हाला पर्वत आणि सुंदर दऱ्या पाहायला मिळतील.
जर तुम्हाला परदेशात पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही स्पेनची निवड करू शकता. हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी योग्य आहे. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता.
हिमाचल प्रदेशमध्ये स्थित बीर-बिलिंग हे पॅराग्लायडिंगसाठी भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन जिंकेल. कांगडा व्हॅलीमध्ये वसलेले हे ठिकाण पॅराग्लायडिंग प्रेमींसाठी योग्य आहे. येथे पॅराग्लायडिंगचा हंगाम ऑक्टोबर ते जून असतो.
ट्रॅव्हलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या नयनरम्य राज्यात असलेले कामशेत हे पॅराग्लायडिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर टेकड्या आणि सोसाट्याचा वारा यांच्यामध्ये पॅराग्लायडिंगची एक वेगळीच मजा आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही इथल्या पश्चिम घाटाच्या सुंदर दृश्यांचाही आनंद घेऊ शकता.
हिमाचल प्रदेश हे नेहमीच लोकांचे आवडते पर्यटन स्थळ राहिले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या हिमाचलमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही पॅराग्लायडिंगसाठी जागा शोधत असाल तर तुम्ही सोलांग व्हॅलीला जाऊ शकता. ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंग करू शकता.
पवना हे महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पॅराग्लायडिंग ठिकाण आहे. पवना तलाव आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे चित्तथरारक दृश्यही तुम्ही येथे पाहू शकता. ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंग देखील करू शकता.