तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःला जखमी करून घेतल्याची घटना समोर आल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. काल रात्री प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अहिल्यानगर येथील सातळकर लोटस रुग्णालयात तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप आणि अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराजांची प्रकृती आता स्थिर असून संसर्ग टाळण्यासाठी भक्तांनी भेटीसाठी गर्दी करू नये.