Solapur News: पुतळा हटवण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; दुसऱ्या दिवशीही माढ्यात तणाव कायम
Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरामुळे अंजणगावात आक्रमक आंदोलकांनी ८ ते १० तास रास्ता रोको केले. त्याचवेळी जमावाकडून दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. पुतळा हटवण्यास ग्रामस्थ आणि संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. तर आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रशासनाने हा पुतळा सन्मानाने हलवून संबंधितांच्या खासगी जागेत ‘शिवसृष्टी’ उभारावी, अशी मागणी केली.
Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
दरम्यान, आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अंजणगावात रात्रीतून बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. पुतळा हटवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये सुरूवातीला जोरदार शाब्दिक चकमकीही झाल्या. त्यावेळी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. या वादात काही पोलीस आणि आंदोलक जखमी झाले असून गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने
हा वाद मुख्यत्वे पुतळा बसवलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झाला आहे. एका गटाच्या मते ही जागा पुतळ्यासाठी योग्य आहे, तर दुसऱ्या गटाने ती जागा ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत हरकत घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून लक्ष्मण हाके यांनी स्थानिक आमदार अभिजीत पाटील यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे, तर बाळराजे आवारे-पाटील यांनी हाके यांच्यावर समाजात फूट पाडल्याचा प्रत्यारोप केला आहे. सद्यस्थितीत, पुतळा सन्मानाने हलवून खासगी जागेत ‘शिवसृष्टी’ उभारावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.






