अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय येथे सुरू असून, पालक संघ समितीच्या वतीने असंख्य पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “लंके सरांची बदली रद्द करा”, “आमचे लाडके शिक्षक परत द्या”, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. शाळेच्या इमारतीत पूर्णतः शिकवणी बंद असून, विद्यार्थी उपोषण स्थळीच थांबले आहेत. यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे.