संग्रहित फोटो
घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया राबवली. आठवडी बाजार हा परिसरातील नागरिकांच्या गर्दीचा ठिकाण असल्याने सायंकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत आणि बाजाराच्या ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर करीत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे दर्यापूर परिसरात एकच चर्चा सुरू असून, पोलिस तपासातून काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला
मित्रासोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले देवेंद्र उत्तमराव सावरकर (वय ५०, रा. न्यू पँथरनगर, नंदनवन) यांच्यावर दोघांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधी मारहाण केली आणि नंतर लोखंडी कडा व दगडाने वार केल्याने त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत.
Ans: आठवडी बाजार परिसरात गजानन खेडकर (वय ६०) यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ans: अवधूत खोडके यांचे नाव संशयित आरोपी म्हणून समोर आले आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Ans: येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.






