बदलापुरातील एका माजी नगरसेवकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी माजी नगरसेवकाला एका महिलेसोबतचे अश्लील फोटो पाठवून आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास महिलेसोबतचे अश्लील फोटो,व्हिडीओ कुटुंबियांना आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करू अशी धमकी आरोपींनी माजी नगरसेवकाला दिली होती. या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परराज्यात जाऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. अखेर या खंडणी प्रकरणात चार आरोपींच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.