दिवाळीतील लक्ष्मीपुजनानंतर बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्व असून बळीराजा म्हणजे शेतक-यांचा राजा म्हणून दिवशी त्याच्या शक्तीची पूजा करण्यात येते. भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील ग्रामस्थ बळीराम पाटील मागील पन्नास वर्षा पासून ही प्रथा जोपासत हा सण साजरा करत आहेत. एक प्रकारे बळीराजाची शक्ती त्या ठिकाणी एकवटलेली असते अशी भावना त्या मागे आहे त्यामुळे बैलाची या दिवशी पूजा केली जाते. बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे सूर्योदया पूर्वी शेतातून अंबाडीचे पाच ते सात फूट उंचीचे अंबाडीचे रोप आणून अंगणात पूजाअर्चना करून लावतात त्या नंतर गावातील असंख्य नागरिक , युवक हे रोपटे उपटण्याचा प्रयत्न करतात जो ते रोपटे उपटेल त्याला बक्षीस दिले जाते.