Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 15.10.2026
पुण्यातील अनंतरराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय काँक्रीट दिन आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आज उत्साहात उद्घाटन झाले असून राज्यभरातून हजारो तंत्रज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नेपाळ-चीन सीमेवरील प्रलयंकारी महापुरानंतर प्रभावित ८४,००० हून अधिक नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघ सुरू असून मदत व बचावकार्य वेगाने राबवले जात आहे.
उत्तर भारतातील मुख्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम असली तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर ओसरून ढगाळ हवामान नोंदवले गेले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोफत बस सेवा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन राज्यभरात सुरू झाले आहे
10 Sep 2026 05:58 PM (IST)
औषध कंपनी MSD ने हैदराबादमधील आपलं टेक सेंटर MSD Launches New Technology Centre: आणखी मोठं केलं आहे. या नवीन सेंटरमुळे कंपनीच्या जगभरातल्या टेक्नॉलॉजी नेटवर्कला जास्त ताकद मिळणार असून आरोग्य क्षेत्रात नवीन शोध लावायला मदत होणार आहे. बुधवारी 10 सप्टेंबर रोजी या नवीन ऑफिसचं उद्घाटन मोठ्या थाटात झालं. यावेळी तेलंगणाचे IT मंत्री डी. श्रीधर बाबू स्वतः हजर होते.
10 Sep 2026 05:48 PM (IST)
भारत आणि चीन या दोन आशियाई महासत्तांमधील संबंधांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि मुत्सद्देगिरीची बातमी समोर आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत (BRICS 2026) सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याला अधिकृत दुजोरा दिला असून, जागतिक राजकारणाच्या दृष्टीने ही एक मोठी राजकीय घडामोडी मानली जात आहे.
10 Sep 2026 05:38 PM (IST)
कुकडी सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेत प्रस्तावित असलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे माणिकडोह जोडबोगद्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला राज्य मंत्रिमंडळाने अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर या तिन्ही तालुक्यांतील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
10 Sep 2026 05:25 PM (IST)
कोकणातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारी रस्त्यांची दुरवस्था ही दरवर्षी भेडसावणारी मोठी समस्या आहे. भौगोलिक रचनेमुळे होणारी अतिवृष्टी, साचणारे पाणी, नालेसफाईचा अभाव आणि अवजड वाहतूक यामुळे दरवर्षी डांबरी रस्ते उखडून मोठ्या प्रमाणावर खड़े पडतात, यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग अॅक्शन मोडवर आला असून, गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
10 Sep 2026 05:10 PM (IST)
चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात दुलीप ट्रॉफीचा (Duleep Trophy 2026) अंतिम सामना खेळला गेला. हा सामना ड्रॉ झाला. परंतु, पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर ईस्ट झोनला विजेता घोषित करण्यात आले. ईशान किशनच्या संघाने पहिल्या डावात ३७२ धावांची आघाडी घेत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयात कर्णधार ईशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ फलंदाजीने दमदार खेळीच केली नाही, तर कर्णधार म्हणून महत्त्वाच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
10 Sep 2026 04:58 PM (IST)
फिलीपिन्समधील (Philippines Ferry Fire) प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या पलावान प्रांताजवळ एक अत्यंत थरारक व दुर्दैवी सागरी दुर्घटना घडली आहे. राजधानी मनिला येथून कोरोन बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ‘एम/व्ही जून एस्टर’ (M/V June Aster) या प्रवाशी फेरीला खुल्या समुद्रात अचानक भीषण आग लागली. आगीच्या तीव्र ज्वाळांनी आणि धुराच्या प्रचंड लोटांनी संपूर्ण जहाजाला काही मिनिटांतच आपल्या कचाट्यात घेतले. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली.
10 Sep 2026 04:57 PM (IST)
चीनमधील (China) शांगडोंग प्रांतातील महत्त्वाच्या बंदर शहर असलेल्या छिंगदाओ (Qingdao) येथून एक अत्यंत थरारक आणि भीषण बातमी समोर आली आहे. येथील ‘चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन’च्या (CSSC) अंतर्गत असलेल्या प्रसिद्ध बेहाई शिपयार्डमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी उभ्या केलेल्या एका परदेशी मालवाहू जहाजाला अचानक भीषण आग लागली. सकाळी साधारण ११:१५ वाजताच्या सुमारास जहाजातून धुराचे प्रचंड लोट निघू लागले आणि काही वेळातच आगीने संपूर्ण जहाजाला आपल्या कचाट्यात घेतले. ही घटना घडली तेव्हा जहाजावर आणि त्याच्या आसपास अनेक तंत्रज्ञ, कामगार आणि जहाजाचे कर्मचारी काम करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे जहाजावर उपस्थित असलेल्या कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
10 Sep 2026 04:56 PM (IST)
उत्तर प्रदेशातील माजी आणि विद्यमान आमदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन आणि इतर लाभांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘लोक प्रहरी’ या स्वयंसेवी संस्थेने उत्तर प्रदेशातील आमदार आणि विधान परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन, भत्ते आणि इतर लाभांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश राज्य सरकारला नोटीस बजावली असून, सरकारला चार आठवड्यांच्या आत या नोटीसवर उत्तर देणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत.
10 Sep 2026 04:55 PM (IST)
आज (10 सप्टेंबर 2026) मध्य रेल्वेवरील सकाळच्या गर्दीच्या वेळेत डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली. डोंबिवली स्थानकातून सकाळी 7.56 वाजता सुटलेल्या लोकलमधून दिवा-मुंब्रादरम्यान एक महिला प्रवासी थेट रेल्वे रुळावर पडली. सुदैवाने सिग्नलमुळे लोकल थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर घाबरलेल्या काही महिला प्रवाशांनी रुळावरून चालत मुंब्रा स्थानक गाठल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गर्दीच्या वेळेतील लोकल प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
10 Sep 2026 04:54 PM (IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा अतिशय गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री सध्या नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सध्या MPSC आणि दुष्काळाच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.
10 Sep 2026 04:53 PM (IST)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीऐवजी यंदा हा सोहळा गुजरातमधील केवडिया येथे होणार आहे. या निर्णयावरून आता राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठेच्या सोहळ्याचं ठिकाण अचानक बदलण्याची गरज काय होती, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत त्यांनी भाष्य करत “भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचे आहेत. तसेच, देशातील चित्रपटसृष्टीत महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं मोठं योगदान आहे. मग हा सोहळा यापैकी एखाद्या राज्यात का आयोजित करण्यात आला नाही,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
10 Sep 2026 03:59 PM (IST)
अमेरिकेच्या (America) इतिहासातील सर्वात भीषण आणि काळा दिवस मानल्या जाणाऱ्या ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण अमेरिका ९/११ हल्ल्यातील (Trump911Claim) मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि प्रथम प्रतिसादकर्त्यांच्या (First Responders) शौर्याचे स्मरण करण्यासाठी सज्ज होत आहे. अशा या गंभीर वातावरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी दावा केला होता की, २००१ मध्ये जेव्हा न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला, तेव्हा ते स्वतः ‘ग्राउंड झिरो’ (घटनास्थळी) बचाव कार्यात सहभागी होते.
10 Sep 2026 03:55 PM (IST)
School Onion Potato Ban Controversy: सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेला तातडीने टाळे लावले पाहिजे. ज्या शाळा अशी मनमानी करत आहेत त्या शाळा तातडीने बंद केल्या पाहिजे. धर्म तुमच्या घरात शाळेपर्यंत धर्म येता कामा नये. विशेषतः प्राथमिक शाळेपर्यंत कोणी धर्म आणत असाल तर, तुम्ही शाळेचे जे कोणी चालक-मालक असतील, त्यांनी घरी बसावं, महाराष्ट्रात अशी बंधने लादली जात असतील तर, धर्माच्या नावावर हे लव जिहाद पेक्षा भयंकर आहे,” अशी टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
10 Sep 2026 03:50 PM (IST)
England Vs Pakistan: सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांमधील शेवटचा सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात देखील पाकिस्तान ढेपाळले आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर देखील पाकिस्तानच्या खेळामध्ये काहीही बदल दिसून आला नाहीये. मात्र यामध्ये फलंदाज सैम अयुब सध्या अत्यंत खराब फॉर्ममुळे आणि एका नकोशा विक्रमामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 133 रन्सवर ऑल आउट झाला आहे.
10 Sep 2026 03:40 PM (IST)
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड एसटी बस (Nashik Bus Stand) स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी (9 सप्टेंबर 2026) या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने पुढील तीन महिन्यांसाठी नाशिकरोड स्थानकाचे संपूर्ण कामकाज नाशिक-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुला खालील, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरातून चालवले जाणार आहे.
10 Sep 2026 03:30 PM (IST)
सोमवारी रात्री कोलकात्याच्या नेताजी भवन रेल्वे स्थानकावर एक विचित्र आणि हिंसक घटना घडली. दोन महिलांचा पारा चढला आणि त्यांनी थेट रेल्वे स्थानकावरील आरपीएफ महिला अधिकऱ्यासोबत हाणामारी करायला सुरुवात केली. हे भांडण इतकं जबरदस्त होतं की आजूबाजूचे प्रवासीही दृष्य पाहून हादरले आणि लोकांनी ही घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घेतली. व्हिडिओमध्ये केस पकडत आणि जमिनीवर लोळवत महिला आरपीएफ जवानाला मारहाण करताना दिसले. घटना सध्या चांगलीच चर्चेत असून चला प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
10 Sep 2026 03:20 PM (IST)
IND vs PAK Hockey: भारत आणि पाकिस्तान हा सर्व पातळीवर युद्धाचा विषय मानला जातो. केवळ क्रिकेट या खेळातच नाही तर सर्वच खेळांमध्ये पाकिस्तानच्या संघाला मात देण्यासाठी भारतीय खेळाडू तयार असतात आणि आता महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा एकतर्फी सामन्यात पराभव केला आहे. पाकिस्तान महिला हॉकी संघाने अत्यंत निराशजनक आणि लज्जास्पद कामगिरी केल्याचे दिसून आले.
10 Sep 2026 03:10 PM (IST)
Sharat Saxena Health: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या MRIचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शरत सक्सेना यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो त्यांच्या शस्त्रक्रियेच्या अगदी आधीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
10 Sep 2026 03:01 PM (IST)
Refined Sugar Market Supply : सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा अचानक मार्केटमधून गायब झाला. त्यामुळे रांगेत येणाऱ्या भारतीय सणांवर त्याचा परिणाम झाला. रक्षाबंधन, जन्माष्टमी गणेशोत्सव हे सण भारतात धुमधडाक्यात साजरे केले जातात. गोडधोड वाटलं जातं पण साखरेचे दर गगनाला भिडल्यानंतर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला दणदणीत फटका बसला आहे. फक्त साखरच नाही तर भाजीपाला आणि अशा बऱ्याच वस्तूंवर महागाईचा दणका पाहायला मिळाला. त्यामुळे घरगुती खर्चावर मोठा परिणाम झाला आहे. ( Refined Sugar Market Supply )
10 Sep 2026 02:59 PM (IST)
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भारतीय वंशाची रोपे विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. भोसला शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंत्री महाजन यांनी युवकांसमवेत वृक्षारोपण केले.
10 Sep 2026 02:50 PM (IST)
मिरा-भाईंदरमध्ये पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, असा मेसेज पालकांना पाठवण्यात आला आहे. मिरारोडमधील सेव्हन स्क्वेअर शाळेने पालकांच्या व्हॉट्सअॅप आणि पोर्टल ग्रुपवर हा अजब मेसेज आला आहे. तर असाच मेसेज नायगावमधील सेव्हन स्क्वेअर शाळेच्या पालकांच्या ग्रुपवरही आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या खासगी शाळेने हा फतवा काढल्याची माहिती समोर आली असून यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
10 Sep 2026 02:40 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी लातूर मध्ये काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा येथे काही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
10 Sep 2026 02:31 PM (IST)
पुणे शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जिवीतास धोका होवू नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
10 Sep 2026 02:21 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ माळशिरस तालुक्यातील संगम येथील मराठा समाज बांधवांनी कराड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून जोरदार आंदोलन केले. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाज आक्रमक होत असून, त्याचाच एक भाग म्हणून संगम येथे हे आंदोलन करण्यात आले
10 Sep 2026 02:10 PM (IST)
नवनिर्वाचित सभासद निवडून आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. ही सर्वसाधारण सभा ही गोंधळा पुरती मर्यादित न राहता चक्क धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.
10 Sep 2026 02:00 PM (IST)
भारताच्या प्रोफेशनल जॉब मार्केटसाठी ऑगस्ट महिना दिलासादायक राहिला आहे. वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांच्या वतीने भरतीत वाढ झाली असून, नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठीही सकारात्मक चित्र समोर आले आहे. नोकरी जॉब स्पीक्सच्या ताज्या अहवालानुसार, ऑगस्टमध्ये देशातील व्हाईट कॉलर हायरिंग गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढले आहे. यादरम्यान ऑटो, हेल्थकेअर आणि रिटेल यांसारख्या सेक्टरमध्ये भरतीला वेग आला.
10 Sep 2026 01:55 PM (IST)
पुण्याच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्री एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली. मैत्रिणीशी फोनवर बोलण्याच्या रागातून तिच्या बॉयफ्रेंडनेच मित्रांच्या मदतीने तरुणाचे अपहरण केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तत्परतेने तपास करत काही तासांतच अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
10 Sep 2026 01:45 PM (IST)
अमेरिकेमध्ये आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांचे (US Midterm Elections 2026) वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. राजकीय वातावरण तापलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी घोषणा करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. २०२६ च्या रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात (RNC Midterm Convention) बोलताना ट्रम्प यांनी जाहीर केले की, जर आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने विजय मिळवून हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हज आणि सिनेट या दोन्ही सभागृहात बहुमताने सत्ता कायम ठेवली, तर अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५,००० डॉलर्स (अंदाजे ४.२० लाख रुपयांपेक्षा जास्त) दिले जातील.
10 Sep 2026 01:40 PM (IST)
Apple वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्याकडे जुना iPhone असेल तरी आता सॅटेलाईटचं फिचर बंद होणार नाही. कंपनीने त्याची फ्री सेवा अजून एका वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजे पैसे न देता तुम्ही अजून एक वर्ष हे फिचर वापरू शकता.खरं तर Apple दरवर्षी हेच करतंय. गेल्या वर्षी iPhone 17 लाँच झाला तेव्हा पण त्यांनी ही मुदत वाढवली होती, त्याच्या आधीच्या वर्षी पण तेच केलं होतं. आता परत एकदा तेच झालंय. लोक म्हणतायत Apple बिल पुढे ढकलत आहे.
10 Sep 2026 01:35 PM (IST)
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या MRIचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शरत सक्सेना यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो त्यांच्या शस्त्रक्रियेच्या अगदी आधीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शरत सक्सेना यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील MRI रूममधील चार फोटो पोस्ट केले आहेत.
10 Sep 2026 01:25 PM (IST)
गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या पूर्वीच्या मुंबई-गोवा महामार्गाला जणू ग्रहण लागल्याची स्थिती आहे. गेली अनेक वर्ष लोकार्पणच्या प्रतीक्षेत असलेल्या या महामार्गाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. याच मार्गासंदर्भात आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना होणारा विलंब आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खराब काम करणाऱ्या आणि प्रकल्पांना विनाकारण विलंब लावणाऱ्या ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
10 Sep 2026 01:18 PM (IST)
Apple ची नवीन सीरीज आली की, जुनं मॉडेल स्वस्त होते. असा विचार आपण नेहमीच करतो. आता मात्र चित्र वेगळं पाहायला मिळत आहे. iPhone 18 Pro आणि त्याचा पहिला फोल्ड होणारा फोन लाँच झाल्याबरोबर कंपनीने भारतात iPhone 17 ची किंमत एकदम वाढवली आहे.किती वाढली किंमत? ऐकून धक्का बसेल. iPhone 17 जो आधी 82,900 रुपयांना लाँच झाला होता, तो आता थेट 99,900 रुपयांना झाला आहे. म्हणजेच त्यांची किंमत 17 हजार रुपयांनी वाढली. दरम्यान iPhone Air ची आधीची किंमत 1,19,900 ला होता, आता त्याची किंमत 1,49,900 झाली म्हणजे तब्बल 30 हजार रुपये जास्त द्यावे लागणार.
10 Sep 2026 01:10 PM (IST)
भारतामध्ये ओळखपत्र म्हणून आधारकार्डकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे ते असणं गरजेचं आहे. नुकतंच UIDAI ने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे UIDAI ने फेस ऑथेंटिकेशनसाठी नवीन टूल लॉन्च केलं आहे . सर्वसामान्यांसाठी याचा काय फायदा आहे? कसा वापर करायचा सविस्तर जाणून घेऊयात.
10 Sep 2026 11:45 AM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाला महिला आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. जर मंधानाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६९ धावा केल्या, तर ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनेल. स्मृती मंधाना सध्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने १७४ सामन्यांमध्ये ३०.६५ च्या सरासरीने ४,६९० धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. मंधानाने तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६३४ चौकार आणि ९५ षटकारही मारले आहेत.
10 Sep 2026 11:35 AM (IST)
साधूचा वेश धारण करून अनेक वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या ७० वर्षीय आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांनी वृंदावनमधून अटक केली. बुधदेव हलदर असे आरोपीचे नाव असून, १९८८ मध्ये एका तरुणीचे अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तब्बल अनेक वर्षे ओळख लपवून राहत असलेल्या आरोपीचा ठावठिकाणा डिजिटल पुराव्यांच्या आधारे शोधण्यात पोलिसांना यश आले.
10 Sep 2026 11:20 AM (IST)
सध्याच्या काळात स्मार्टफोन केवळ संपर्काचे माध्यम न राहता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन बनला आहे. ऍपलने काल ९ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या ‘Surprise and Shine’ इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहेत. या नवीन सिरीजमध्ये समाविष्ट असलेले फीचर्स उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि संशोधनाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणारे आहेत.
10 Sep 2026 11:10 AM (IST)
अॅपलने भारतात आपले नवीन आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स लाँच केले आहेत. अॅपलने आपला पहिला फोल्डेबल आयफोन ड्युओ देखील सादर केला आहे. एकूण, ऍपलने तीन मॉडेल्स लाँच केले आहेत, जे सर्व एकमेकांपेक्षा बरेच वेगळे आहेत. नवीन आयफोन 18 च्या लाँचमुळे, अनेकजण विचार करत आहेत की ते नवीन आयफोन 18 कधी आणि कसा खरेदी करू शकतील. अॅपल आयफोन 18 बुकिंगबद्दलची नवीनतम माहिती जाणून घेऊया.
10 Sep 2026 11:05 AM (IST)
धार्मिक भावना आणि धार्मिक श्रद्धांबाबात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बापट यांनी नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरणासह हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, माफी न मागितल्यास आणि स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
10 Sep 2026 09:45 AM (IST)
Sangli Wrestling Competition: खानापूर तालुक्यातील बलवडी येथे भवानी देवीच्या यात्रेनिमित्त भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने महिलांच्या खास कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती.
या मैदानातील प्रथम क्रमांकाची ३ लाख रुपयांची मुख्य कुस्ती हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन पैलवान सोनम मलिक आणि दिल्लीची राष्ट्रीय पदक विजेती पैलवान वेदिका सासणे यांच्यात पार पडली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर, म्हणजे अवघ्या ३० सेकंदांत सोनम मलिकने दुहेरी पटातून एकेरी पट काढत वेदिका सासणेला चितपट केले आणि विजय मिळवला.
10 Sep 2026 09:20 AM (IST)
Maharashtra Rain Forecast: गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. बाप्पाच्या आगमनाच्या काळातच राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक उन्हाचा चटका आणि तीव्र उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, आता राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे
10 Sep 2026 09:15 AM (IST)
Vidyanand Bapat Legal Notice: धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी ठाम मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे.
10 Sep 2026 09:05 AM (IST)
Pune Metro Ganeshotsav Special: गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या दिवसांत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये आणि त्यांचा प्रवास जलद, सुरक्षित व विनासायास व्हावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासोबतच सेवेची वेळही वाढवण्यात आली आहे.






