गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तथा बीड शहरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे. त्यातच बीड शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जाणाऱ्या जुन्या दगडी पुलावरन देखील तीन फूट पाणी वाहत आहे.. यामुळे जुन्या बीड शहराचा संपर्क तुटला आहे…जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या वतीने देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.