महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी आश्रम शाळांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण थांबवावे आणि दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी आंदोलकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेले 110 दिवसांचे आंदोलन कायम ठेवत रोजंदारी कर्मचारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलक मुंबईच्या राजभवनाच्या दिशेने ‘पायी बिऱ्हाड मोर्चा’ निघाले आहेत. हातात महापुरुषांचे फलक, डोक्यावर राघोजी भांगरे यांची मूर्ती आणि ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन हजारो आंदोलक 14 ऑक्टोबरपासून निघाले असून, 27 ऑक्टोबर रोजी ते राजभवनावर धडकणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.