भिवंडी महानगरपालिका स्थापन झाली त्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्त्वपूर्ण योगदान होते. 2002 व 2007 या दोन्ही वेळच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखालील भिवंडी विकास आघाडीने 11 नगरसेवक निवडून आणले होते. त्यातून 2007 मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी पटकावले होते. परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेस मध्ये विलीन केली होती. त्यानंतर काँग्रेस मधील स्थानिक राजकारणाला कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केले असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौघुले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला.भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. पालिकेच्या सुरवातीच्या दहा वर्षात भिवंडी विकास आघाडी सत्तेत असताना शहराच्या विकासाला हातभार लागला.त्यामुळे शहरात स्थानिक पक्ष असावा अशी सर्वांचीच मागणी आल्याने पुन्हा एकदा भिवंडी विकास आघाडी एकता मंच सुरू करीत आहोत अशी माहिती भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे.