बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्र. D-15 (क्लोथवेरी प्रिंटिंग कारखाना) येथून घातक रासायनिक पाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याचा आरोप सालवड ग्रामपंचायतीने केला आहे.१२ सप्टेंबरच्या मध्यरात्री ग्रामपंचायत सदस्यांनी संशयित टॅंकर पकडून बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान टॅंकर बंदी असतानाही हा टॅंकर औद्योगिक क्षेत्रात शिरल्याची माहिती समोर आली आहे.या बेकायदेशीर सांडपाण्यामुळे सालवड पास्थळ गावातील कुपनलिकेत रासायनिक पाणी आढळल्याने जलप्रदूषणाचा धोका गंभीर झाला आहे. स्थानिकांनी अशा टॅंकरमुळे पाणीपुरवठा व आरोग्यावरील धोक्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.बोईसर पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सतिश अस्वर यांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले.