जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात युती जाहीर केली आहे. मात्र दापोलीत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोलीत सेना भाजप युतीसाठी आपण आग्रही असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र भाजप सोबत यायला तयार नसेल तर आपण शंभर टक्के तयारी केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून दापोलीतील शिवसेना भाजप युती तुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.