अपेक्षा होती २४ तासाच्या आत भारत हल्ला चढवेल, मात्र आम्हालाही माहिती होत की, देशवासीयांना विश्वासात घ्यावे लागते आज जो भारताने हल्ला केला आहे. त्याच आम्ही स्वागत करतो. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, ते भारताने केले. यामुळे भारतीय आनंदी आणि संतुष्ट आहे. सर्व देशवासीयांची हीच भावना होती. उरी, पुलवामा, वैष्णोदेवी पहलगाम ह्या हल्ल्यामुळे देशवासियांमध्ये राग होता. दहशतवादी तळावर हल्ला करावा, मात्र सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतील. आपली संस्कृती वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध होत होते, त्या काळी महाराज व मावळे कधीही मुल आणि महिलांवर हात टाकत न्हवते. डोनाल्ड ट्रम्पवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. अमेरिकेत त्याचा विरोध चालला आहे. तो विचित्र माणूस आहे. हा हल्ला नाही, आत्मसरक्षणासाठी भारताने उचललेले पाऊल आहे. हा भारताचा अधिकार आहे. https://youtu.be/m01-AJ1xWuU?si=8f3PNCYMIBh3wiPj