
नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! (Photo Credit - X)
२० टक्क्यांसह इतर योजनेतील घरांचाही होणार समावेश
सन २०२५ च्या सोडतीतही २० टक्के योजनेतील घरांनाच चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये सोडतीत घर न लागलेल्या आणि आता ठाण्यासह आसपासच्या परिसरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
कोकण मंडळाने नव्या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून घरांची शोधाशोध सुरू आहे. सोडत्तीत २ हजारपेक्षा अधिक घरे समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
२० टक्के योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष
यात २० टक्क्यांसह इतर योजनेतील घरांचाही समावेश असेल, असेही सूत्रांनी सांगितले प्रकल्पाचे ठिकाण, घराची किंमत आणि इतर कारणांमुळे या घरांना प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, या घराचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करून त्यांची मंडळाला विक्री करावी लागते, मात्र २० टक्के योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असते.
सोडतीचे महत्त्वाचे मुद्दे:
घरांची संख्या: अंदाजे २,००० पेक्षा जास्त.
संभाव्य काळ: फेब्रुवारी – मार्च २०२६.
प्रमुख ठिकाणे: ठाणे आणि लगतचा कोकण परिसर.
प्रमुख आकर्षण: २० टक्के योजनेतील घरे.