जालन्यात शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी जबरी हल्ला केल्याची घटना घडली आहे. जालना तालुक्यातील थार येथे ही घटना घडली. विनोद भास्करराव शिंदे हे नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता शेतात टेहळणीसाठी गेले होते. मात्र, यावेळी तोंडाला रुमाल बांधलेले सात ते आठ जण शेतात असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. शेतकऱ्याने त्यांना हटकले असता दरोडेखोरांनी विनोद शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. चाकूने वार करत त्यांच्या खिशातील पैसे आणि बोटातील अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्याचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी पळ काढला. दरम्यान, जखमी शेतकऱ्याला पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.