जालना येथे महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिनानिमित्त भव्य परेडचे आयोजन करण्यात आले. जालना येथील पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी 9 वाजता पथसंचलन व सलामीसह ही परेड मोठ्या उत्साहात पार पडली. या परेडमध्ये पोलीस विभागातील अधिकारी, पदाधिकारी, पोलीस जवानांसह नागरिक व विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची आधुनिक पद्धतीने स्थापना झाली. त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पोलीस दलाची शिस्त, सेवा व समर्पण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.