जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकंरांना हजारो बौद्ध बांधवानी अभिवादान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम खोपोली शहरात खोपोली नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो.या वर्षीही असाच भव्य कार्यक्रम साजरा होत आहे. पाच दिवस संयुक्त जयंती महोत्सव साजरा होत असून मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर विविध वक्त्यांची भाषणे, व मोठी मिरवणूक काढली जाते.आज जयंती निमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहरातील हजारो बौद्ध बांधवानी अभिवादान केले. शहरात विविध भागातून ढोल ताश्याच्या गजरात मिरवनुका काढण्यात आल्या. खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते आज सकाळी निळा ध्वज फडकवण्यात आला व डॉ. बाबासाहेब आंबेडकंरांना पुष्पहार अर्पण करून एक छोटेखानी सभा झाली. यावेळी शहरातील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक सह मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी बच्चे कंपनीने लेझिम खेळ साजरा केला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संविधान घर उभारले होते व त्यात संविधाना संधर्भात माहिती देण्यात येत होती. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी या संविधान घराचीही पहाणी केली.