कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावरून शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असतानाही हिंदूंनाच दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, मंदिर प्रवेशाचा प्रश्न आता राजकीय वादाचा विषय बनला आहे. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर निर्बंध लादणे चुकीचे असल्याचे सांगत प्रशासनाकडून तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.