राजधानी दिल्ली इथं संसदेवर मोर्चा काढत असताना विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीच्या वतीने दुचाकी रॅली काढून बंदच आवाहन करण्यात आलंय. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरुन दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून कार्यकर्त्यांनी आस्थापनांना बंद पाळण्याचं आवाहन केलंय.कोणी हात जोडून तर कोणी जबरदस्तीने आस्थापनांना बंद पाळण्यासाठी आवाहन केल्याचं पहायला मिळालं.यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.