कोल्हापुरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरांनी जन आंदोलन उभा केला आहे.याच पार्श्वभूमीवर गडहिंग्लज , आजरा आणि चंदगडकरांनी गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला आहे. गडहिंग्लज इथं जैन मंदिरपासून सुरुवात झालेल्या मोर्चाची प्रांत कार्यालयाजवळ सांगता करण्यात आली. या मोर्चात सर्वधर्मीय नागरिक आणि जैन धर्मातील महाराज यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान या आंदोलनातून नागरिकांनी महादेवी हत्तीणीबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.शिवाय जोपर्यंत महादेवी हत्तीणंं परत येत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.