विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या मारामारीमुळे लोकशाहीच्या बुरुजाची अप्रतिष्ठा झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे गैर आहे. असे वक्तव्य राष्ट्रपती नियुक्त खासदार पद्मश्री ऍड उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राजकारण्यांनी प्रसंगी स्वतःचा संसार सोडून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटले पाहिजे अशी अपेक्षा असते, पण असे घडत नाही त्यावेळी राजकारण्यांची प्रतिमा मलीन होत असते असे मत ऍड उज्वल निकम यांनी व्यक्त केले.कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. लवकरच त्याचे काम सुरू होईल, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा भार कमी होऊन या परिसरातील सहा जिल्ह्यातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल. अशी आशा खासदार ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.