एकीकडं वृक्षतोडीवरुन राज्यभरात वातावरण तापलं असताना कोल्हापूर जिल्ह्यात वृक्षलागवडीतूंन सामाजिक संदेश देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खन केदारण्य’ प्रकल्प साकारण्यात येत आहेत..या प्रकल्पातंर्गत जोतीबाच्या पायथ्याला दुर्मीळ आणि महामार्गावरील बाधित झाडांच प्रत्यारोपण करण्यास सुरुवात झाली आहे..रत्नागिरी – नागपूर आणि पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गच्या कामामध्ये बाधित ठरणाऱ्या मोठ्या आणि दुर्मिळ झाडांना त्या ठिकाणाहून काढून थेट जोतिबा डोंगर परिसरात त्यांना जीवदान देण्यात येत आहे. शिवाय ‘केदार विजय’ ग्रंथात उल्लेख असलेल्या दुर्मीळ लहान वृक्षांचं देखील संगोपन आणि संवर्धन करण्यात येत आहेत..आमदार विनय कोरे यांच्या हस्ते या ‘दख्खन केदारण्य’ या देवराई प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलायं..भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने मोठमोठी जुनी झाडं लावण्यात येत आहेत..कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर परिसरात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दोन हजार झाडांचं प्रत्यारोपण करण्यात येणार आहे..विकास प्रकल्पांमुळे महामार्गावरील तोडली जाणारी झाडं वाचविण्याचा एक सकारात्मक प्रयत्न या निमित्तानं सुरू आहे..त्यामुळे दोन हजार झाडांना पुर्नजीवन मिळणार असून जोतिबा डोंगर देवराईनं समृद्ध होणार असल्याचं म्हटलं जात आहे.