
कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा गेल्या अनेकवर्षांपासून चर्चेचा विषय आहे. वाढत्यालोकसंख्येचा ताण, पायाभूत सुविधांचीगरज आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी हद्दवाढ अपरिहार्यअसल्याचे मत वारंवार व्यक्तहोतआहे. मात्र,महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादीकाँग्रेस (शरद पवार आणि शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) यांनी आरोप केलाआहे.
महायुती सरकारने हद्दवाढीच्यामुद्द्यावर केवळ आश्वासनांची खैरातकेली; प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस पावलेउचलली नाहीत. यामुळे शहराचानियोजनबद्ध विकास खुंटला असून, नागरी ‘कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय लाबवून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांतील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबी रखडल्या, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्याऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वासही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
‘कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय लांबवून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांतील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबी रखडल्या, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वासही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरातील रस्त्यांचा दर्जा हा देखील कळीचा मुद्दा ठरत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड़े निकृष्ट कामामुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. विरोधकांनी यावरून महायुती सरकारसह महापालिकेतील सत्ताधाऱ्याऱ्यांना जबाबदार धरले आहे. रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, त्याचा फटका थेट नागरिकांच्या सुरक्षिततेला बसत आहे.” असा आरोप करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने निवडणूक प्रचारात या दोन्ही मुहयांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने संयुक्तपणे प्रचाराची रणनीती आखली जात असून, जनतेपर्यंत सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. येत्या काळात सभांमधून, प्रचारफेऱ्यांतून आणि समाजमाध्यमांद्वारे आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एकूणच, निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, हद्दवाढ, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर जनतेचा कौल ठरणार आहे. वाढत्या राजकीय तापमानामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Ans: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. हद्दवाढ आणि रस्त्यांचा दर्जा हे प्रमुख मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत.
Ans: वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांची गरज आणि नियोजनबद्ध विकासासाठी शहर हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
Ans: महाविकास आघाडीने आरोप केला आहे की, महायुती सरकारने हद्दवाढीबाबत फक्त आश्वासने दिली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.