साखर कारखान्यातील गन मेटलची चोरी तसेच घरफोडी प्रकरणातील तिघांना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. लातूर तालुक्यातील मुरुड येथील बायपास रोडवरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत ही कारवाई केलीय. पोलिसांच्या अधिक तपासात त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील १७ आणि नांदेड जिल्ह्यातील एक असे एकूण १८ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती लातूरचे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.