
Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण
Raigad News: नगरपरिषदांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात, २ डिसेंबर रोजी होणार मतदान
चिंचोली गावात राहणारे बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून काम करीत होते. सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी १० वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला. गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते. सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले. मात्र वडील घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. त्यांचा काही थांगपत्ता लागला नसल्याने गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
याबाबत दुर्गापूर पोलिसांना व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली. काही वेळात वनविभाग व पोलिसांची टीम त्याठिकाणी दाखल झाली. गेडाम यांचा शोध घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुऱ्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. रात्री ११ वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हात त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला.
गेडाम यांचा मृतदेह मिळाल्यावर नागरिकांचा वनविभागवर रोष उफाळून आला. रात्रीपासून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. वनविभागाने नागरिकांना शांत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे पाठविले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी होता. आतापर्यंत वाधाच्या हल्ल्यात ३६, बिबट २. अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष रोखण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही.