लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून वरुणराजाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून संततधार पाऊस सुरू असून, तो अद्यापही सुरू आहे. काही ठिकाणी अधूनमधून पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याचे चित्र आहे.. या पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुसरीकडे मात्र खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून, मोठ्या पावसाची त्यांना अद्यापही प्रतीक्षा लागून आहे.