लातूर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून राजमाची आवक होत असून सध्या बाजारात राजमाला प्रतिक्विंटल ९००० ते ९३०० रुपयांच्या आसपास भाव मिळतोय. दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यात सर्वाधिक पसंतीची भाजी म्हणून ओळख असलेल्या राजमा पिकाला गेल्या दोन वर्षात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हे पिक घ्यायला सुरुवात केली असून, सध्या लातूर बाजार समितीत राजमाची आवक वाढलीय. सध्या बाजारात दररोज जवळपास ७५० क्विंटल राजमाची आवक होत असून, लातूर जिल्ह्यासह धाराशिव आणि बीड जिल्ह्यातून ही आवक सुरू असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिलीय. राजमाला दर चांगले मिळत असल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात राजमा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.