माढा तालुक्यातील जामगाव येथे चोरीच्या उद्देशाने ६१ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. अजिंक्यकुमार गौतम चव्हाण याला कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. जामगाव येथील अशोक भीमनण्णा मुळे यांच्या घरात घरफोडी करून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. चोरीदरम्यान मुळे यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला.