
भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; 'या' प्रकरणातून झाली सुटका
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप होता. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील तत्कालीन भाजप उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी जामखेड येथे पाशा पटेल यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी कथित अश्लील वक्तव्य आणि हातवारे केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या कृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होईल, असे चिथावणीखोर वर्तन केल्याचा आरोप करत जामखेड येथील एका महिलेने पाशा पटेल यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला आणि पाशा पटेल यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्यात सहा साक्षीदारांची साक्ष
या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील सुनावणी पूर्ण करून पाशा पटेल यांची संबंधित गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पाशा पटेल यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ गोरक्ष पालवे, कैलास शेवाळे आणि मिर्झा मणियार यांनी न्यायालयात बाजू मांडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या या कथित प्रकारामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. आता न्यायालयाने पाशा पटेल यांची निर्दोष मुक्तता केल्याने या प्रकरणाला न्यायालयीन स्तरावर महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
हे सुद्धा वाचा : आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
Ans: जामखेड येथील प्रचारसभेतील कथित अश्लील वक्तव्य आणि हावभाव प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
Ans: १४ नोव्हेंबर २०२४ रोजी जामखेड येथे प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेदरम्यान हा कथित प्रकार घडला होता.
Ans: अहिल्यानगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी हा निकाल दिला.