Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली असताना, एका शेतकऱ्याने या मदतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री यांना साडीचोळीचा ‘आहेर’ पाठवला आहे. या कृतीतून शेतकऱ्याने आपला निषेध व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2026 | 06:47 PM
Maharashtra Drought 2026

Maharashtra Drought 2026

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळी मदतीवरून शेतकऱ्याची नाराजी
  • मुख्यमंत्र्यांना साडीचोळी पाठवून व्यक्त केला निषेध
  • ५ हजारांच्या मदतीची घोषणा, पण शेतकरी नाराज
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना प्रती ५ हजार रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर एका शेतकऱ्याने याला ‘बळीराजाची चेष्टा’ म्हणत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पवारवाडी येथील शेतकरी प्रेमचंद बजरंग मुंढे यांनी आपल्या एक एकर सोयाबीन पिकातून मिळालेल्या २७२० रुपये रकमेचा ‘आहेर’ मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. (Maharashtra Drought 2026)

मुंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे अर्ज सादर करून मुख्यमंत्र्यांना हा आहेर पाठवल्याची माहिती दिली. त्यांच्या अर्जात म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चान्याची टंचाई भासत असतानाही दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेबांनी प्रती शेतकऱ्याला ५००० रुपये घोषणा करून राज्यातील बळीराजाची चेष्टा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्याकडून भर पेरावा आहेर करण्यात आला आहे.”

Smart Bazaar तील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्यांचा त्रास? ग्राहकाने केली कारवाईची मागणी

शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्या शेतात एक एकरात केवळ ४० किलो सोयाबीन निघाले. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी माजुली ट्रेडर्स येथे विक्री केल्यानंतर एक किलो कडता व १० रुपये हमाली मिळून एकूण बिल २८०० रुपये झाले. त्यातून ८० रुपये वजा जाता उरलेली रक्कम २७२० रुपये. हीच रक्कम त्यांनी मुख्यमंत्र्यांना आहेर म्हणून पाठवली आहे. “या पैशांत स्वतःच्या उपजीविकेसाठी किराणा तर उर्वरित राहिलेल्या पैशाच्या मुख्यमंत्री साहेबांना आहेर,” असे ते म्हणाले.

अर्जात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर ‘बळीराजाचे सरकार’ म्हणून घोषणा केली, पण त्याच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. “लाडक्या बहिणीच्या भाच्याला त्या पाच हजार रुपयांत कपडे येतात काय? दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने बहिणीला-भाच्याला दिवाळीला कधी घेऊन येणार आणि त्यांचा सन्मान आम्ही कसा करणार?” असा सवाल मुंढे यांनी केला आहे.

शेतकऱ्याने प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. “आई तुळजाभवानीने नवरात्रीच्या व दशर्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री साहेबांना सदबुद्धी देवून किमान शेतकऱ्याला ५०,००० रुपये हेक्टरी देण्यात यावे,” अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

हा अर्ज व संबंधित कागदपत्रे (सोयाबीन विक्रीची पावती व स्पीड पोस्टची पावती) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी (वर्शा बंगला, मालाबार हिल, मुंबई) पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. पोस्टाच्या पावतीनुसार २१ ऑक्टोबर रोजी ही रक्कम पाठवण्यात आली आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जाची नोंद झाली असून शेतकऱ्याच्या या कृतीने स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती मदतीची घोषणा करण्यात आली आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

  • Que: शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा आहेर का पाठवला?

    Ans: दुष्काळी मदतीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा ‘आहेर’ पाठवल्याचे वृत्त आहे. या कृतीमागील नेमकी भूमिका संबंधित शेतकऱ्याच्या निवेदनातून स्पष्ट करणे आवश्यक आहे.

  • Que: दुष्काळी मदतीबाबत शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या आहेत?

    Ans: मदत प्रत्यक्षात मिळण्यास होणारा विलंब, पात्रतेच्या अटी, अर्जप्रक्रिया आणि पंचनाम्यांशी संबंधित अडचणी या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या समस्या ठरू शकतात. मात्र, या विशिष्ट प्रकरणात नेमकी कोणती अडचण आहे, याची स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे.

Web Title: Drought relief 5000 announcement farmer sends saree choli gift to chief minister sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
1

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क

Smart Bazaar तील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्यांचा त्रास? ग्राहकाने केली कारवाईची मागणी
2

Smart Bazaar तील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्यांचा त्रास? ग्राहकाने केली कारवाईची मागणी

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका
3

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका

Mira Bhayandar मध्ये ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’चे बॅनर झळकले; ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ घोषणेची चर्चा
4

Mira Bhayandar मध्ये ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’चे बॅनर झळकले; ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ घोषणेची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.