
८०० नागरिकांनी घेतला महाप्रसाद
खराशी येथील गायत्री माता मंदिरात मंगळवारी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७०० ते ८०० नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास काही नागरिकांना उलटी व जुलाबाचा त्रास जाणवू लागला. त्रास वाढू लागल्याने नागरिकांनी उपचारासाठी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. एकाच कार्यक्रमात भोजन केलेल्या अनेक नागरिकांना समान जाणवू लक्षणे लागल्याने संभाव्य अन्नविषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नमुना तपासणीचे निष्कर्ष आल्यानंतरच विषबाधेमागील कारण निश्चित होण्यास मदत होणार आहे.
लोकप्रतिनिधींकडून रुग्णांच्या उपचाराचा आढावा
खराशी येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर साकोली विधानसभा क्षेत्राचे आ. नानाभाऊ पटोले आणि विधान परिषद सदस्य आ. अविनाश ब्राह्मणकर यांनी खराशी तसेच ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांवरील उपचार आणि आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.
Bhandara News: मानव-वन्यजीव संघर्षाचा विळखा! नऊ महिन्यांत ७ जणांचा बळी; पशुधन व पीक नुकसानीचेही सावट
उपचार घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी येथील वैद्यकीय अधिकारी तसेच लगतच्या आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी खराशी येथे धाव घेतली. गावात विशेष आरोग्य शिबिर सुरू करून बाधितांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १२० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २१ रुग्णांना ग्रामपंचायत कार्यालयातील आरोग्य शिबिरात दाखल करून उपचार देण्यात आले. नऊ रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे संदर्भित करण्यात आले, तर इतर रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, सुमारे ५० रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे दाखल असल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये तीन गर्भवतींचा समावेश असून, त्यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांनी खराशी गावासह ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दाखल रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेत त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत अंबेकर आणि जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर हेही गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आरोग्य विभागाच्या विविध पथकांमध्ये समन्वय राखून बाधितांचा शोध, उपचार आणि पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: खराशी गावात किती रुग्णांवर उपचार करण्यात आले?
उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 120 रुग्णांवर उपचार करण्यात आले.
प्रश्न 2: खराशी येथे नागरिकांची तब्येत का बिघडली?
उत्तर: गायत्री माता मंदिरातील महाप्रसादानंतर नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. अन्नविषबाधेचा संशय आहे, पण नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नमुन्यांच्या तपासणीनंतर अधिक माहिती मिळू शकते.
प्रश्न 3: आरोग्य विभागाकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत?
उत्तर: गावात विशेष आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करत असून, गरजेनुसार रुग्णांना पालांदूर आणि भंडारा येथील रुग्णालयांत पाठवले जात आहे.