महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार सन २०२३ – २४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे सुपुत्र ऋषिकेश पुंडलिक मालोरे यांना दि. १८ एप्रिल रोजी पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या आनंदी क्षणाच्या निमित्ताने माणगाव येथे ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत फुलांनी सजलेल्या गाडीत ऋषिकेशची माणगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासमवेत, मित्र, परिवार, वकील संघटना पदाधिकारी, समस्त माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.