Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

नेरळमध्ये विकासकामांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ठेकेदारांची साडेचार कोटींची बिले रखडली आहेत. या प्रकरणाबाबत एमएमआरडीएकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 01:55 PM
Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

जुन्या तारखा (बॅकडेटेड) दाखवून प्रशासकीय मान्यता आणि विकास परवानग्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप

एकीकडे ‘बॅकडेटेड’ मंजुरीची तक्रार आणि दुसरीकडे थकीत बिलांसाठी उपोषणाचा इशारा

नेरळ विकास प्राधिकरणातील प्रशासकीय वादासोबतच आता विकासकामांच्या थकीत बिलांचा प्रश्नही गंभीर

कर्जत: नेरळ परिसराच्या नियोजन आणि विकासाचे सर्व अधिकार राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हस्तांतरित केले असतानाही, रायगड जिल्हा परिषद व स्थानिक ग्रामपंचायतींकडून जुन्या तारखा (बॅकडेटेड) दाखवून प्रशासकीय मान्यता आणि विकास परवानग्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय गंगाराम सावंत यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Black Magic Scam: ”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

रायगड जिल्हा परिषद आणि पुणे नगररचना विभागाने २००७ मध्ये नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नगरविकास विभागाने १९ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करून नेरळ परिसर ‘विशेष नियोजन क्षेत्र’ म्हणून घोषित केले व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१) (क) अंतर्गत या भागाचे सर्व अधिकार एमएमआरडीएकडे सोपवले, त्यामुळे या प्राधिकरणावरील जिल्हा परिषदेचे अधिकार संपुष्टात आले आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)

मुंबई ३.० संकल्पनेअंतर्गत कर्जत-नेरळ परिसराच्या विकासाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असताना, अधिकार हस्तांतरणानंतरही जिल्हा परिषद कार्यकाळातील जुन्या तारखांचा आधार घेत प्रशासकीय मान्यता, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि तांत्रिक मंजुरी दिल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे ‘बॅकडेटेड’ मंजुरीची तक्रार आणि दुसरीकडे थकीत बिलांसाठी उपोषणाचा इशारा, या दुहेरी पेचावर एमएमआरडीए आणि जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण कर्जत-नेरळ परिसराचे लक्ष लागले आहे.

४.५ कोटींचे थकीत बिल

नेरळ विकास प्राधिकरणातील प्रशासकीय वादासोबतच आता विकासकामांच्या थकीत बिलांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतीच्या हद्दीत काम केलेल्या ठेकेदारांची तब्बल साडेचार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. ही प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत, या मागणीसाठी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी नेरळ येथे पत्रकार परिषद घेत प्रशासनाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

नसलेल्या अधिकारांचा कथित गैरवापर केल्यामुळे विकासकामे आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ कागदपत्रांवर जुनी तारीख टाकून चालणार नाही, तर प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या, निधी वितरण आणि कार्यादेशांच्या तारखाची सखोल पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे. – संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते

Maharashtra POCSO Cases 2024 : महाराष्ट्रात पॉक्सोचे ९,४३२ गुन्हे; बाल सुरक्षेसाठी विद्या बालन मैदानात

तक्रारीतील ‘या’ प्रमुख मागण्या आणि मुख्य मुद्दे

  • उच्चस्तरीय चौकशीः संशयास्पद पद्धतीने दिलेल्या मान्यता नेमक्या कधी तयार झाल्या, मंजूर झाल्या आणि त्यावर स्वाक्षऱ्या कधी करण्यात आल्या, याची सखोल तपासणी करावी.
  • कामाना तात्काळ स्थगिती चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाना स्थगिती देऊन मंजूर कामे व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करावे.
  • दोषीवर कारवाई: अधिकार नसताना बेकायदेशीर परवानग्या देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
  • शासनाकडे पाठपुरावाः या तक्रारीची प्रत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनाही पाठवण्यात आली आहे.

Web Title: Neral development authority row backdated approvals allegedly issued despite mmrda taking over powers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी
1

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET
2

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल
3

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
4

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.